मुंबई

निवृत्तीनंतर गावी जाऊन राहण्याचे स्वप्न अधुरे

CD

नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये पहाटे झालेल्या गोळीबारात आरपीएफचे सहायक पोलिस निरीक्षक टिकाराम मीणा यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मीणा कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. टिकाराम २०२५ मध्ये निवृत्त होणार होते. त्यापूर्वीच सेवानिवृत्ती घेऊन आपल्या कुटुंबासोबत गावात जाऊन स्थायिक होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. आपल्या वडिलांचे हे स्वप्न अपूर्ण राहिल्याची खंत त्यांची मुलगी पूजा मीणा यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली.
आरपीएफमध्ये सहायक पोलिस निरीक्षक असलेले टिकाराम मीणा मूळचे राजस्थानच्या सवाई माधूपरमधील श्यामपूरचे रहिवासी होते. महिनाभरापूर्वी ते आपल्या गावी गेले होते. त्या वेळी घरच्यांसोबत बोलताना टिकाराम यांनी आता चार-पाच महिन्यांनंतर स्वेच्छानिवृत्ती घेतो. त्यांनतर सर्वांसोबत गावीच राहणार आहे, असे सांगितले होते. टिकाराम यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. टिकाराम यांच्या पश्चात वडील रामकरण मीणा, आई भुरी देवी, पत्नी बर्फी देवी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. मुलगा दिलकुशचे लग्न ठरले आहे, तर मुलगी पूजा हिचेही लग्न झाले आहे.
टिकाराम मुंबईच्या आरपीएफ बॅरेकमध्ये राहत होते. त्यांची मुलगी टिटवाळ्यात राहते. तिचे पतीदेखील रेल्वेत स्टेशन मास्तर म्हणून कार्यरत आहेत. टिकाराम हे नेहमी आपल्या मुलीच्या घरी ये-जा करीत असत.
...
शेवटची भेट
अब्दुल कादर मोहम्मद हुसेन या ६० वर्षीय प्रवाशाचा या गोळीबारात मृत्यू झाला. अब्दुल हे नालासोपारा इथे आपल्या पत्नीसोबत राहत होते. नालासोपारा इथे त्यांचे प्रोव्हिजनल स्टोअर आहे. कादर यांना दोन मुले असून दोघेही दुबईला नोकरी करतात. पत्नी मोहोरमसाठी दुबईला गेली होती, तर अब्दुल कादर हे उत्तर प्रदेशातील आपल्या मूळ गावी मोहोरमनिमित्त गेले होते. तेथून जयपूरहून मुंबईला परत येत होते. या घटनेत मृत्यू झालेले अजगर अब्बास शेख हे शिवडी इथे मजुरीचे काम करायचे. त्यांचे संपूर्ण कुटुंब जयपूरला राहते. कुटुंबीयांना भेटून ते या गाडीने मुंबईत परत येत होते. ही त्यांची शेवटची भेट ठरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs WI : संजू सॅमसनची ९७ धावांची मॅच विनिंग खेळी! भारत ऐतिहासिक विजयासह उपांत्य फेरीत; आता इंग्लंडला भिडणार

BMC Property Tax: मुंबईकरांना दिलासा!मालमत्ता करात मोठा बदल; ७०० स्क्वेअर फूट घरांना फायदा, बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय

Paithan Crime: अपहृत विद्यार्थिनीची सुटका, शिक्षकास बेड्या; पैठण पोलिसांची मुंबईत कारवाई, लोकेशन बदलून देत होता हुलकावणी!

महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होणार! राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीचा प्लॅन ठरला; अमित शाहांनी रवींद्र चव्हाणांना काय सांगितलं?

Solapur Crime: छत्रपती शिवाजी महाराजांचा बेकायदा पुतळा बसवल्याप्रकरणी अंकोलीच्या अकरा जणांवर गुन्हा; शासकीय नियमांचे उल्लंघन!

SCROLL FOR NEXT