मुंबई

पबजी गेम खेळण्याच्या वादातून मित्रावर हल्ला

CD

भिवंडी, ता. ३१ (बातमीदार) : मोबाईलवर पबजी गेम खेळण्याच्या वादातून मित्रावर धारदार हत्याराने वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना भिवंडीत घडली आहे. याप्रकरणी हल्लेखोर मित्रावर कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनी बंडू कापडी (वय २०) असे गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोराचे नाव आहे; तर आकाश नाना महाजन (वय २०) असे हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी जखमी आकाश व सनी हे दोघे मित्र मोबाईलवर पबजी गेम खेळत होते. दरम्यान, आकाशने सनीला गेम खेळताना अश्लील शिव्यांची कमेंट केल्याने दोघांत वाद झाला होता. रविवारी (ता. ३०) पुन्हा पबजी गेममध्ये शिवीगाळ केल्याचा वाद उफाळून येताच सनीने अचानक आकाशवर धारदार हत्याराने वार करत त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर जखमी अवस्थेत आकाशला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी कोनगाव पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. ३१) पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Gokul Election : नविद मुश्रीफ, चुयेकर, बाळासाहेब खाडेंचा अर्ज ४७० उमेदवारी अर्जांची विक्री ; ५४२३ संस्था मतदार; १८, १९, २० सप्टेंबरला सुटी

CM Birthday : दिव्यांग मुलांसोबत मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस; केक कापताना मुलांचे प्रेम पाहून झाले भावुक

Cow Milk Rates Rise To ₹43 Per Litre :दूध उत्पादन घटले; संस्थांत ‘पळवापळवी’ वाढली सणासुदीच्या मागणीसह दुष्काळी स्थितीचा परिणाम; गायीचे दूध ४३ रुपये

IND vs AFG : मॅच विनिंग खेळीनंतरही संजू सॅमसनला बाकावर बसवणार? श्रेयस अय्यरने दिले संकेत; कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

SCROLL FOR NEXT