मुंबई

एसीक्लोफेनाक, केटोप्रोफेन पशुवैद्यकीय औषधांवर बंदी

CD

गिधाडांच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारचे पाऊल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ५ : गुरांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारी एसीक्लोफेनाक आणि केटोप्रोफेन ही औषधे गिधाडांसाठी घातक ठरत आहेत. या औषधांचा पशुवैद्यकीय वापर, विक्री आणि उत्पादनावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. याबाबत ३१ जुलै २०२३ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. गिधाडांच्या संवर्धनासाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगत पर्यावरणवाद्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

१० मे २०२३ रोजी दिल्लीच्या ड्रग्ज टेक्निकल अॅडव्हायझरी बोर्डाच्या (डीटीएबी) बैठकीत हा विषय मांडण्यात आला होता. या बैठकीत या दोन्ही पशुवैद्यकीय औषधांवर बंदी घालण्याची शिफारस केली होती. ‘केटोप्रोफेन आणि एसीक्लोफेनाकचा उल्लेख असलेली विविध उत्पादने ही डायक्लोफेनाकसारखीच घातक आहेत. त्यामुळे गिधाडांचा मृत्यू होऊ शकतो. अभ्यासातून हे स्पष्‍ट झाले आहे,’ असे डीटीएबी बैठकीत मांडण्यात आले.

आजारी गुरांना डायक्लोफेनाक, एसीक्लोफेनाक आणि केटोप्रोफेन ही वेदनाशामक औषधे दिली जातात; मात्र आजारी गुराचा मृत्यू झाल्यास त्यांना गावाशेजारी फेकून दिले जाते. गिधाडांनी या गुरांचे मांस खाल्ल्यास या औषधांमुळे ते गिधाडांसाठी विषारी ठरते. यामुळे त्यांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या प्रजननक्षमतेवर विपरीत परिणाम होतो, असा तज्जांचे म्हणणे आहे.
--------------------------------
कोट
केंद्र सरकारने या दोन्ही औषधांवर तात्काळ बंदी आणली आहे हे अभिनंदनीय आहे. डीटीएबीने बैठकीत याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केला. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यावर केंद्राने तातडीने अधिसूचना जारी केली. यामुळे गिधाड संरक्षणासाठी मदत होईल. २००६ मध्ये पहिल्यांदा ही मागणी केली होती. तेव्‍हा डायक्लोफेनाकवर बंदी आणण्यात आली होती. त्यानंतर आता या औषधांवर घातलेली बंदी निश्‍चितच स्वागतार्ह आहे.
- किशोर रिठे, अंतरिम संचालक आणि मानद सचिव, बीएनएचएस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT