मुंबई

पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील यांना राष्ट्रपती पदक

CD

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. १५ ः कल्याण गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक संजय माळी यांना राष्ट्रपती पदक पुरस्कार जाहीर झाला आहे. गुन्हे शाखेतील माळी यांना सेवेत ३२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या सेवाकाळात त्यांना ३५८ बक्षिसे व १२ प्रमाणपत्रे मिळाली आहेत. पोलिस शिपाई म्हणून त्यांनी आपल्या सेवेला सुरुवात केली. त्यांची नुकतीच पोलिस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती झाली आहे. पदोन्नती आणि राष्ट्रपती पदक प्राप्त झाल्याने माळी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय सेवांसाठी विविध पदके जाहीर केली आहेत. पोलिस दलातील कर्मचाऱ्यांनादेखील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे राष्ट्रपती पदक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कल्याण परमंडळ ३ मधील कल्याण गुन्हे शाखेत कार्यरत असलेले संजय माळी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. संजय हे फेब्रुवारी १९९० मध्ये पोलिस शिपाई म्हणून ठाणे शहर पोलिस येथे रुजू झाले. त्यांनी आतापर्यंत वागळे इस्टेट, वर्तकनगर, विशेष गुन्हे शाखा ठाणे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उल्हासनगर व कल्याण येथील गुन्हे शाखा विभागात सेवा दिली आहे. याच महिन्यात त्यांची पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाली आणि त्यापाठोपाठ त्यांना राष्ट्रपती पदकदेखील जाहीर झाल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

जळगाव येथील भडगावचे मूळ रहिवासी असलेले संजय माळी यांचे वडीलदेखील पोलिस खात्यात अधिकारी पदावर होते. शिक्षण घेतल्यावर संजय माळी हे १९९० मध्ये पोलिस खात्यात नोकरीला लागले. आतापर्यंत त्यांची ३२ वर्षे ८ महिने सेवा झाली आहे. २०१९ मध्ये बदलापूर-अंबरनाथ परिमंडळात कार्यरत असताना घरफोडीचे प्रमाण वाढले होते. त्याचा तपास करत असताना तांत्रिक माहितीच्या आधारे अनेक मोबाईल नंबर हे यूपीचे असल्याचे निदर्शनास आले होते. सदर आरोपींना यूपी येथे जाऊन अटक करण्यात आली होती. त्या वेळी ४२ गुन्हे उघडकीस आले होते. याआधीही संजय माळी यांना उत्कृष्ट कामगिरीमुळे महाराष्ट्र पोलिस महासंचालनालय- मुंबई यांच्याकडून सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले आहे. आतापर्यंत ३५८ बक्षिसे माळी यांनी प्राप्त केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT