मुंबई

अनधिकृत पार्किंग करणाऱ्या ३३ ट्रॅव्हल्सवर कारवाई

CD

नालासोपारा, ता. १८ (बातमीदार) : विरारमध्ये मुख्य रस्त्यावर पार्किंग करून मुख्य रस्ता गिळंकृत करणाऱ्या ३३ ट्रॅव्हल्सवर शुक्रवारी (ता. १८) धडक कारवाई करण्यात आली. अवघ्या दोन तासांत ७३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वसई-विरार महापालिका आणि विरार वाहतूक शाखा यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. कारवाई सुरू होताच अनेक ट्रॅव्हल्सचालकांनी पळ काढला.

विरार पूर्व मनवेलपाडा ते नालासोपारा, बायपास रोड, लिंक रोड, मोहक सिटी परिसर या ठिकाणी मोठमोठ्या ट्रॅव्हल्सनी पार्किंग करून ३० मीटरचे रस्ते गिळंकृत केले आहेत. रस्त्यावरून जाणारे नागरिक, शाळेत मुलांना सोडायला जाणाऱ्या महिला-पुरुष वाहनधारक, आजूबाजूच्या सोसायटीतील रहिवाशांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सहा महिन्यांपूर्वी एका ट्रॅव्हल्समध्ये अनोळखी मृतदेहही सापडला होता. याबाबत माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष उदय जाधव, मनसेचे प्रफुल जाधव, प्रहार संघटनेचे हितेश जाधव यांच्यासह रहिवाशांनी आरटीओ, वाहतूक पोलिस, महापालिकेकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. शुक्रवारी वसई-विरार महापालिका आणि विरार वाहतूक पोलिस यांनी संयुक्तरीत्या ३३ ट्रॅव्हल्सवर कारवाई करून तत्काळ ७३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करून, सर्व ट्रॅव्हल्स त्या ठिकाणाहून हलवल्या आहेत.

--------------
आमच्याकडे अनेक दिवसांपासून तक्रारी होत्या. आम्ही दंडात्मक कारवाया केल्या होत्या. याच ट्रॅव्हल्सवर आठ हजारांपासून ३६ हजारांपर्यंत ऑनलाइन दंड भरणा थकीत होते. आम्ही आज धडक कारवाई करून ७३ हजाराचा दंड वसूल केला आहे. यानंतरही कारवाई सुरूच राहणार आहे.
- प्रशांत लांगी, प्रभारी पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा

---------------
आमच्या सर्व ट्रॅव्हल्स कोकणातील विविध भागात चालतात. मनवेलपाडा परिसरात कोकणातील जास्त नागरिक राहतात. आम्ही शासनाला टॅक्स देतो. आमच्या ट्रॅव्हल्सला पालिकेने अधिकृत पार्किंग व्यवस्था करून द्यावी, यासाठी संबंधित प्रशासनाकडे मागणी केली आहे; पण कोणी लक्ष देत नसल्यामुळे आम्हाला मोकळ्या जागेत गाड्या पार्किंग कराव्या लागतात.
- ॲन्थोनी डिसूझा, पालघर जिल्हा सचिव, मुंबई ट्रॅव्हल्स, बस चालक-मालक संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पगार वाढल्याशिवाय कामावर नाही येणार, कामगार ठाम; जाळपोळ आणि तोडफोड सुरूच, ७ FIR, ३०० जण ताब्यात

Kolhapur Danoli Crime : कोल्हापुरातील दानोळीमध्ये अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, भरतेशचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल

Pune Crime: हवेली तालुक्यात जमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; परस्पर विरोधात फिर्याद, ८ जणांविरुद्ध गुन्हा!

Latest Marathi News Update: नेस्कमधील कॉन्सर्टचा आणखी एक व्हिडिओ समोर, अनेकांनी ड्रिंक अँड ड्राईव्ह केल्याचा ही अंदाज

Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

SCROLL FOR NEXT