विरार, ता. १८ (बातमीदार) : स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत पालिकेचे आयुक्त आणि अधिकाऱ्यांबाबत अपमानास्पद वक्तव्य केले होते. त्याचा वसई-विरारमधील सर्वच विरोधी पक्षांनी निषेध केला असून शुक्रवारी (ता. १८) हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या जनता दरबारात वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पालिका आयुक्त आणि प्रशासक यांच्यासह अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून कार्यालयात येऊन मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणाला आता राजकीय रंग चढू लागला आहे. या घटनेनंतर बविआच्या विरोधातील सर्वच राजकीय पक्ष एकत्र आले असून त्यांनी बविआला खिंडीत पकडण्याचे धोरण अवलंबले आहे. शुक्रवारी सायंकाळी याबाबत भाजप, दोन्ही शिवसेना, जनता दल, आप, प्रहार संघटना, आगरी सेना, तसेच काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येत आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हुकूमशाहीविरोधात लढा देण्याचे निश्चित केले असून या घटनेचा निषेध करत राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना निवेदन पाठवून हितेंद्र ठाकूर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.