मुंबई

आरोग्य व्यवस्था सुधारवण्यासाठी निधी पुरवणार

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : कळवा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष दिले आहे. येथील आरोग्य व्यवस्था सुधारावी, यासाठी निधी आणि मनुष्यबळासाठी चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. तसेच विधान परिषदेच्या उपसभापती या नात्याने आणि ठाणेकरांना कशी मदत करता येईल, हाच आपला हेतू असल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले.
शुक्रवारी (ता. १८) ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात कळवा रुग्णालयातील घटनेसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला चौकशी समितीमधील पदाधिकारी, कळवा रुग्णालयातील डॉक्टरदेखील उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. कळवा रुग्णालयात घडलेली घटना अतिशय दु:खद आणि धक्कादायक आहे; परंतु कोविड काळात आणि कोविडनंतर बऱ्याचशा अत्यवस्थ असलेल्या रुग्णांना जीव गमावण्याची वेळ येते, याची वस्तुस्थिती काय आहे, आणि हे का घडले, याच्या खोलामध्ये जाणे गरजेचे आहे. तसेच मृतांमध्ये ऑक्सिजनच प्रमाण किती होते, आयसीयूमध्ये कोणती कमतरता पडली होती का, त्यावेळी डॉक्टर किती होते, याचा अंदाज घेतला आहे. ज्या डॉक्टरांनी आणि येथील कर्मचाऱ्यांनी १८ मृत्यू पाहिले आहेत, त्यांना मानसिक बळ देण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT