मुंबई

‘जीएसटी’च्या अधिकाऱ्याला लाच घेताना अटक

CD

मुंबई, ता. १८ : सीबीआयने शुक्रवारी वस्तू आणि सेवा कर विभागाच्या भिवंडी आयुक्तालयात नियुक्त अधीक्षकाला लाचप्रकरणी अटक केली. हेमंत कुमार असे आरोपी अधिकाऱ्याचे नाव असून सीबीआयने आरोपीच्या मुंबई आणि गाझियाबाद येथील ठिकाणांवर छापेमारी केली आहे. या कारवाईत सीबीआयकडून ४२.७ लाख रुपये रोख आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली. एका खासगी कंपनीचा जीएसटी परतावा रद्द करण्यासाठी आरोपी अधिकाऱ्याने कंपनीकडे ३० लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. या तक्रारीवरून प्राथमिक चौकशी केल्यानंतर आरोपी अधिकारी कुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीबीआयने आरोपी अधिकाऱ्याला पकडण्यासाठी सापळा रचला. त्याप्रमाणे लाच घेताना आरोपी कुमारला सीबीआयने पकडले. आरोपीला मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने २१ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : सासरच्या छळाला कंटाळून महिलेने संपविले जीवन; सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Water Supply News : शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी सुरळीत राहणार

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

Junnar Khirehwar News: जुन्नरच्या खिरेश्वरमध्ये माती माफियांवर महसूल विभागाची धडक कारवाई; अवैध माती वाहतूक करणारे वाहन जप्त

Amravati Crime : दोन पीडितांवर अमरावतीमध्ये अत्याचार; आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटीचे गठण

SCROLL FOR NEXT