मुंबई

सात दिवसांनी भेटला मृतदेह

CD

मुरबाड, ता. २० (बातमीदार) : काळू नदीच्या पात्रात बुडालेल्या हैदराबाद येथील आयटी इंजिनिअर तरुणाचा मृतदेह ड्रोनच्या साह्याने शोधण्यात अखेर सात दिवसांनी पोलिसांना यश मिळाले आहे. अभिषेक रावतळ (वय २९) असे त्याचे नाव आहे. शनिवारी (ता. १२) काळू नदीच्या पात्रात तो बुडाला होता. मात्र त्याचा मृतदेह शोधण्यात यश येत नव्हते. गत शनिवारी हैद्राबाद येथून चार तरुण दुपारी दोनच्या सुमारास माळशेज घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या थितबी येथील धबधब्यावर गेले होते. त्यातील एक तरुण अभिषेक काळू नदीमध्ये वाहून गेला होता. त्याचा मृतदेह सापडला नव्हता. पोलिसांनी सात दिवस या तरुणाचे शोधकार्य सुरू ठेवले होते. रायगड बचाव पथक, मुरबाड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अनिल घरत, हरेश सानप, दीपक विशे, थितबी ग्रामस्थ यांनी शनिवारी पुन्हा एकदा ड्रोनच्या साह्याने शोधमोहीम हाती घेतली. यावेळी ड्रोन धबधब्याच्या प्रवाहाच्या दिशेने आतमध्ये टाकला असता अभिषेकचा मृतदेह तेथे अडकल्याचे आढळले. मृतदेहाचे ठिकाण समजल्याने बचाव पथकाने अँकर हुकच्या मदतीने मृतदेहाला बाहेर काढले. मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asha Bhosle Favorite Leader : आशा भोसलेंचा आवडता नेता कोण? भारदस्त आवाज असणारा नेता अत्यंत जिवलग मित्र...

Breaking News Live Update: ठाकरे गटाचे न बोलणारे खासदार लवकरच शिंदे सेनेत: भरत गोगावले

Asha Bhosle Passes Away: छातीतील इन्फेक्शनमुळे खरंच कार्डियॅक अरेस्ट येतो का? डॉक्टरांनी सांगितलं काय आहे कनेक्शन

फॅनच्या कृतीनं टीम डेव्हिड वैतागला, हातातला फोन घेतला अन्....; विमानतळावरील Video Viral

IPL 2026, LSG vs GT: शुभमन गिलने जिंकला टॉस; गुजरात - लखनौच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काय झाले बदल?

SCROLL FOR NEXT