मुंबई

अखेर रेश्मा खरात यांना मिळाले घर

CD

दिवा, ता. २१ (बातमीदार) : दिव्यातील रेश्मा खरात या सामाजिक कार्यकर्तीला घरातून सामानासह जबरदस्तीने बाहेर काढल्याच्या निषेधार्थ त्या उपोषणाला बसल्या होत्या. अखेर त्यांनी सुरू केलेल्या या लढ्याला यश आले असून त्यांचे हक्काचे घर त्यांना परत मिळाले आहे. आंदोलनात सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे रेश्मा खरात यांनी आभार मानले आहेत.
रेश्मा खरात यांच्या आंदोलनाला दिव्यातील आंबेडकरी चळवळीतील प्रमुख नेते एकनाथ भगत (रिपाइं- आठवले ओबीसी आघाडी अध्यक्ष), दिनेश पाटील (रिपाइं- दिवा शहर अध्यक्ष), मिलिंद गवई (वं. ब. आ. दिवा शहर अध्यक्ष), प्रमोद खांबे (बसपा, दिवा शहर अध्यक्ष), सुबोध पवार (रिपाइं- आंबेडकर पक्ष), राधाताई तोरणे (रिपाइं- आठवले महिला आघाडी दिवा) व दिव्यातील इतर आंबेडकरी संघटना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव कमिटीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता. अमोल केंद्रेही रेश्मा खरात यांच्यासह आंदोलनात उतरले होते. अखेर या आंदोलनाला यश आले असून रेश्मा खरात यांना त्यांचे घर परत मिळाले आहे.
रेश्मा खरात यांनी ज्या घर मालकाकडून घर विकत घेतले होते, त्याच मालकाने हे घर सतीश केळशीकर यांना विकले होते. खरात यांनी अर्धी रक्कम मालकाला दिली होती. आता भाजपचे केळशीकर यांना खरात यांनी उर्वरित १७ लाख रुपयाचे आगाऊ चेक दिले असून खरात यांना घराचा ताबा मिळाला आहे, अशी माहिती भाजपचे विजय भोईर यांनी दिली.
सर्व आंबेडकर चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्यांची, महिलांची, समाज सेवक अमोल केंद्रे व पोलिस बांधव यांची मोलाची साथ मला मिळाली. त्यामुळे मी हा लढा जिंकला आहे, असे रेश्मा खरात यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? २० वर्षे जुनं प्रकरण पुन्हा उघडलं; PWD कनेक्शन नेमकं काय?

सिल्लोड-जळगाव महामार्गावर भीषण अपघात; पालोद येथे भरधाव ट्रकच्या धडकेत १५ वर्षीय बालकाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : धुळ्यात महसूलमंत्री बावनकुळेंनी अधिकाऱ्याची शेतातच घेतली ‘शाळा’

Noida Crime : सातव्या महिन्यातच मुलाचा जन्म, उपचारासाठी खर्च झाले ४० लाख; इंजिनिअरने कर्ज, तवाणावातून ४३ व्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवले

Pitru Paksha 2026: सर्वपित्री अमावस्येला नवरात्रीच्या पूजेचे सामान खरेदी करावे की नाही? जाणून घ्या नियम...

SCROLL FOR NEXT