मुंबई

तीन बांगलादेशींना घणसोलीतून अटक

CD

नवी मुंबई, ता. २१ (वार्ताहर) : घणसोली सेक्टर- ७ मधील झोपडपट्टीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशींना दहशतवादविरोधी पथकाच्या मुंबईतील चारकोप युनिटने अटक केली. कमल हुसेन अब्दुल शेख (२७), मोहम्मद मिठू युसुफ खान (४८) व सिकंदर अकील मुल्ला (५४) अशी या तिघांची नावे असून दोन वर्षांपासून वास्तव्यास असल्याचे तपासात उघड झाले आहे.
घणसोली सेक्टर- ७ मधील झोपडपट्टीत बांगलादेशी बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या मुंबईतील चारकोप युनिटला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने गुरुवारी (ता. १७) मध्यरात्री रबाळे पोलिसांच्या मदतीने अडीचच्या सुमारास घणसोली सेक्टर-७ मधील झोपडपट्टीत छापा मारला होता. या कारवाईत तीन बांगलादेशी नागरिकांचे बेकायदा वास्तव्य असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तिघांनी विनापासपोर्ट वैध कागदपत्रांशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश केल्याने विदेशी व्यक्ती अधिनियम तसेच पारपत्र अधिनियमानुसार रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat प्रकरणात मोठा स्फोट! 58 नाही तर, 100+ व्हिडिओ असल्याची माहिती उघड, ‘तांत्रिक’ शोषणाचा काळाकुट्ट खेळ समोर

IPL 2026 Marathi News: बाळासोबत वेळ घालवायचाय... ७ सामने नाही खेळू शकणार स्टार गोलंदाज... नियमानुसार होणार बंदीची कारवाई?

Ashok Kharat Case : "सावित्रीची लेक जिथे भोंदू पावलांवर वाकली...." अमोल कोल्हेंची रुपाली चाकणकर यांच्यावर बोचरी टीका

दिवसभर ACमध्ये बसता? तुमची इम्युनिटी कमी होतेय का? काय काळजी घ्यावी जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : रेडिमिक्स ट्रकवरून सिमेंट सांडत असल्याने आमदार देवयानी फरांदे आक्रमक

SCROLL FOR NEXT