मुंबई

चालकाच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

CD

पालघर, ता. २१ (बातमीदार) : कारचालकाचे अपहरण करून खूनप्रकरणी तीन आरोपींपैकी दोघांना पालघर पोलिसांनी ओरिसामध्ये अटक केली. त्यांच्याकडून कार हस्तगत करण्यात आली असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

आसिफ घाची या चालकाला १२ ऑगस्ट रोजी पालघर रिक्षा स्टँडवर तीन अनोळखी व्यक्तींनी नाशिक येथून कुटुंबाला आणण्यासाठी भाड्याने कार पाहिजे असे सांगितले. महेश सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधून त्यांची कार भाड्याने घेऊन आसिफ तीन प्रवाशांसह नाशिककडे निघाला. मध्यरात्रीच्या वेळी आसिफची पत्नी आणि कार मालकांनी त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू केला; मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे पालघर पोलिस ठाण्यात १३ ऑगस्ट रोजी बेपत्ता तक्रार दाखल केली. त्याची गाडी नाशिकला न जाता सिन्नरकडून समृद्धी मार्गाने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक दत्तात्रेय केंद्रे आणि अधिकारी, कर्मचारी मिळून ८० लोकांची टीम तयार करून गुन्ह्याचा तपास सुरू केला.

धर्मानंद उमाकांत जाल (वय २४), सेसवा ऊर्फ प्रीतम सांता मेहर (वय २५), खुशीराम ऊर्फ राजू दोलामणी जाल (मूळ रा. ओडिसा) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. ते बोईसरजवळील कोलावडे येथे राहत असल्याचे पोलिसांना आढळले. धर्मानंद आणि सेसवा ऊर्फ प्रीतम यांना अटक करण्यात आली. खुशीराम ऊर्फ राजू याचा शोध पोलिस घेत आहेत, अशी माहिती सोमवारी (ता. २१) पत्रकार परिषदेत पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली.

असा लागला गुन्ह्याचा शोध
मोखाड्याजवळील मोर्चुंडी घाटात गळ्याला नायलॉनची दोरी बांधलेल्या अवस्थेत आसिफचे शव मिळून आले. त्याला ठार मारून तिघांनी गाडी पळवून नेल्याचे समोर आले. तसेच सीसीटीव्हीमध्ये कारचालक वेगळा असून ते ओरिसाकडे गेल्याचे दिसून आले. पालघर पोलिसांना बोईसरजवळील कलावडे गावी ओरिसामधील काही लोक राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ओरिसामध्ये गेलेल्या पोलिस पथकाला संशयितांची माहिती दिल्यानंतर एका आरोपीला जंगलामध्ये कारसह अटक केली. दुसरा आरोपी पळून गेल्याचे समजल्याने त्यालाही अटक केली. या दोघांनाही कारसह पालघर येथे आणले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Noise : पुण्यात डीजेपुढे पोलिस हतबल!, पोलिसांसमोरच डीजेचा दणदणाट अन् दादागिरीची भाषा; ‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’

विद्यार्थिनीवर कथित अत्याचाराचा मेसेज व्हायरल; विद्यार्थ्यांनी विद्यापीठात केली तोडफोड, राष्ट्रीय महामार्गही रोखून धरला

IND vs WI, 1st ODI Weather : पहिल्या सामन्यात पावसाचा अडथळा येणार? तिरुअनंतपुरममध्ये कसे आहेत हवामान अंदाज, घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : ही लोकशाहीची हत्या : संजय राऊत

Theatre and Memories : नाटक संपतं, पण वस्तूंच्या आठवणी राहतात; ‘बेगम बर्वे’पासून ‘गोदो’पर्यंतचा रंगानुभव

SCROLL FOR NEXT