मुंबई

परळमध्ये ''होऊ द्या चर्चा'' कार्यक्रमाचे आयोजन

CD

परळमध्ये ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रमाचे आयोजन
शिवडी (बातमीदार)ः शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सुशोभीकरणाच्या आणि रस्ते सिमेंट क्राँक्रीटीकरणाच्या नावाखाली केलेला भ्रष्टाचार आणि सध्या राजकारणाचे झालेले अधःपतन या विषयावर ‘होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम शिवसेना शाखा क्रमांक २०४ च्या वतीने मंगळवारी (ता. २२) सायंकाळी ६.३० वा. परळ येथील बेस्ट वसाहत, गणेशोत्सव मंडप येथे होणार आहे. या कार्यक्रमास खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, विभागप्रमुख आशिष चेंबूरकर, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे; तर या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन प्रश्न विचारावेत, असे आवाहन माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी केले आहे.
...................
गुणवंतांचा गुणगौरव सोहळा
प्रभादेवी (बातमीदार) : अंधेरी (प) येथील नवकिरण मंडळाच्या वतीने गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शाळा-महाविद्यालय व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा नवकिरण मंडळाच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रपतींच्या हस्ते नर्सिंग क्षेत्रातील फ्लोरेन्स नाईटिंग पुरस्कार मिळालेल्या नवकिरण मंडळाची माधवी राणे-चिखले हिचा विशेष सन्मान करण्यात आला. नवकिरण मंडळाचे अध्यक्ष मधुसूदन सदडेकर, रवींद्र चिले, मंडळाचे सचिव सुभाष राणे, महेंद्र सुर्वे, रिना मुलिया, संतोष चव्हाण आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT