मुंबई

राणी बागेत गिरवा वनस्पती शास्त्राचे धडे!

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २१ : विविध प्रजातींच्या पशू-पक्ष्यांची धम्माल मस्ती अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयास भेट देतात. येथील प्राणी-पक्षी यांचे निरीक्षण करतात. आता राणी बागेत सहलीनिमित्त येणाऱ्या विद्यार्थ्यांना वनस्पती शास्त्राचे धडे दिले जाणार आहेत. काही महाविद्यालयीन विद्यार्थी प्राणिशास्त्र, वनस्पती शास्त्राचा चिकित्सक अभ्यास करतात. त्यामुळे राणी बाग बच्चेकंपनीसह मोठ्यांसाठीही मनोरंजनासाठी असली तरी येथे वनस्पती शास्त्राचे धडे मिळत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात सतत विविध उपक्रम राबविण्यात येतात. उद्यान व प्राणिसंग्रहालयातील विविध प्रकारची झाडे, झुडपे, फुलझाडे, दुर्मिळ वनस्पती, देशी-परदेशी प्रजातींची फुले आणि फळझाडे आदींचा अभ्यास करण्यासाठी शाळा, महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांच्या सहली येत असतात. ‘साऊथ इंडियन इज्युकेशन सोसायटी’च्या घाटकोपर आणि माटुंगा येथील दोन शाळांच्या २०० विद्यार्थ्यांनीही शिक्षकांसह बागेतील जपानी उद्यानाला सोमवारी (ता. २१) भेट दिली.

विद्यार्थ्यांनी उद्यानातील विविध रोपांची, झुडपांची, झाडांची माहिती जाणून घेतली. उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी विद्यार्थ्यांना उद्यानाविषयी, निरनिराळ्या फूल झाडांविषयी माहिती दिली. वनस्पती शास्त्राबाबत जे ज्ञान, माहिती शाळेच्या चार भिंतीत मिळाले नसते ते उद्यानात मिळाले, अशी प्रतिक्रिया यावेळी विद्यार्थ्यांनी दिली.

अभ्यासाच्या रुचीत वाढ!
राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थी उद्यानाविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी येत असतात. काही विद्यार्थी वनस्पती शास्त्राचा सखोल आणि चिकित्सक अभ्यास करण्यासाठी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानाची निवड करतात. निसर्ग संपदा आणि विविध वनस्पतींच्या प्रजाती एकाच ठिकाणी अभ्यासाला मिळत असल्याने या विद्यार्थ्यांची अभ्यासविषयक रुची वाढत आहे. उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी आणि येथील अभ्यासक, अधिकारी, कर्मचारी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.

अभ्यासाकडे कल
तीन महिन्यांपासून घाटकोपर येथील राम निरंजन झुनझुनवाला महाविद्यालयातील वंदना यादव (एमएससी, वनस्पती शास्त्र विभाग), कल्याण येथील बी. के. बिर्ला ऑटोनॉमस महाविद्यालयातील सायली राहतवाल आणि नक्षत्रा शिंदे (पर्यावरणशास्त्र विभाग) या विद्यार्थिनी उद्यानातील रोपांचे वर्गीकरण आणि ओळख, उद्यानातील रोपांचे संगोपन, तसेच पक्ष्यांचे जीवनमान, झाडांचे महत्त्व आणि फुलपाखरे आदींचा अभ्यास करत आहेत. तसेच काही महिन्यांपूर्वी अमेरिकेतील अभ्यासक जुलीया कनेको हीदेखील उद्यानात आठ दिवसांसाठी अभ्यास दौऱ्यावर येऊन गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Update: अजिंक्य रहाणेने सोडले KKR चे कर्णधारपद? व्हायरल पोस्टने उडवली खळबळ, त्यात लिहिलंय...

BAMU Recruitment: मराठवाडा विद्यापीठात ७८ पदांसाठी तब्बल ६,९१४ अर्ज; हार्डकॉपीसाठी १८ मार्चपर्यंत मुदत

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत घरगुती गॅस टंचाई

ISrael-Iran War : इराणचा तेल जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; समुद्रात उड्या मारल्याने २७ जण बचावले

Teacher Cyber Fraud Case : तुमच्या मोबाईलवरही असा व्हिडिओ कॉल येतोय? CBI अन् पोलिसांच्या नावाने निवृत्त शिक्षकाला घातला 59 लाखांचा गंडा, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT