मुंबई

तेजस ठाकरेंना सापडली सापाची नवी प्रजाती

CD

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई, ता. २१ : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निसर्गप्रेमी पुत्र तेजस ठाकरे यांना सापाची नवी प्रजाती आढळून आली आहे. आज नागपंचमीच्या मुहूर्तावरच या प्रजातीच्या शोधाला मान्यता मिळाली आहे. ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनला पश्चिम घाटात सापडलेल्या या प्रजातीचे नाव ‘सह्याद्रीफोबिस’ किंवा ‘उत्तरघाटी’ असे ठेवण्यात आले आहे.

तेजस ठाकरे आणि हर्षिल पटेल या दोघांच्या संशोधनातून सापडलेल्या या प्रजातीच्या शोधाला लंडन येथील ‘नॅचरल सोसायटी म्युझियम’ आणि जर्मनी येथील ‘मॅक्स प्लॅन्क इन्स्टिट्यूट’ यांनी मान्यता दिली आहे. ‘टॅक्सॉनॉमी’ या जगप्रसिद्ध मासिकाने याबद्दल फाऊंडेशनचे अभिनंदन केले आहे. प्रजातीला नाव देताना पश्चिम घाटातील उत्तरेत हे साप आढळून आले असल्याने ‘उत्तरघाटी’; तर सह्याद्रीत सापडलेले साप म्हणून ‘सह्याद्रीफोबिस’ हे नाव देण्यात आले आहे. फोबिस म्हणजे साप, पश्चिम घाटातील वन आणि प्राणीसंपदा कायम कुतूहलाचा विषय ठरली असून त्यात सतत काहीतरी नवीन सापडत असते, हे पुन्हा सिद्ध झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : कोल्हापुरात माॅन्सूनचे धडाक्यात पुनरागमन; पुढच्या काही तासांत मुंबईसह अमरावती, कोकणात पावसाचा जोर वाढणार; कुठे ऑरेंज तर कुठे येलो अलर्ट

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणात दोषी ठरलेल्या भीमराव कांबळेला आज विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार

Ketan Agarwal Killed Case : घटनास्थळी प्रसंगाची पुनर्निर्मिती; लोहगडावर पुतळ्याच्या साह्याने गुन्ह्याची अडीच तास पुनर्तपासणी

Anant Ambani : अनंत अंबानी यांची तिरुमलात सुप्रभात सेवा

Iran America War : आखातात पुन्हा भडका! बहारीन, कुवेतवर क्षेपणास्त्र हल्ले; अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणचे चोख उत्तर

SCROLL FOR NEXT