मुंबई

घरावर भिंत कोसळून तरुणीचा मृत्यू

CD

मुंबई, ता. २१ : कुर्ला पश्चिमेतील शिवमंदिर परिसरात हॅप्पी होम बंगल्याच्या मागील बाजूची संरक्षक भिंत खालील चाळीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत वैष्णवी राजपती (१८) या तरुणीचा मृत्यू झाला. हीर घटना सोमवारी सायंकाळी ७.३० वाजता घडली. अंदाजे आठ फूट उंचीची ही संरक्षक भिंत राजपती कुटुंबीयांच्या घरासह एकूण चार घरांवर अचानक कोसळली. यावेळी वैष्णवी ही घरात मोबाईल बघण्यात व्यस्त होती. तिची लहान बहीण काही कामासाठी बाजूलाच गेली होती. या घटनेत वैष्णवीच्या डोक्यावर भिंतीचा मोठा भाग पडल्याने ती गंभीर जखमी झाली. शेजाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तिला नजीकच्या भाभा रुग्णालयात उपचारासाठी नेले; मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
घटनास्थळी चार घरांवर भिंतीचा भाग कोसळल्याने पोलिस व पालिका अधिकाऱ्यांनी तात्काळ धाव घेऊन मदतकार्य केले. तसेच, सुरक्षिततेच्या कारणास्तव चार घरांतील २० जणांना पालिकेने नजीकच्या शाळेत स्थलांतरित केले आहे. काहीजण त्यांच्या नातेवाईकांकडे गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Project : पोयनार, न्यू मांडवे धरणांना मान्यता; मंत्री कदम, पोयनारला २६५, न्यू मांडवेला १९५ कोटी

Nashik Municipal Corporation : नाशिकच्या २४ खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार! महापालिका अंदाजपत्रकात 'खेडे विकास निधी'ची तरतूद

'यापेक्षा पॉर्न बरं असतं' नोरा फतेहीच्या गाण्यावर भडकले नेटकरी, म्हणाले...'शब्द असे की...'

"काहीही झालं तरीही व्यायाम चुकवत नाही" कमळीच्या 68 वर्षांच्या आजीचं थक्क करणारं फिटनेस रुटीन

Latest Marathi News Live Update : सांगोला पेपर चोरी प्रकरणाची बोर्डाकडून दखल; अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव

SCROLL FOR NEXT