मुंबई

अन्न औषध प्रशासनाची सीबीडीतील हॉटेलवर कारवाई

CD

नवी मुंबई, ता. २३ (वार्ताहर) : सीबीडी बेलापूर, सेक्टर- १५ मधील शिवराज ढाबा येथे आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या तरतुदींचे पालन केले जात नसल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने हा ढाबा तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार हा ढाबा आता बंद करण्यात आला आहे.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात हॉटेल तपासणी मोहीम राबवली जात आहे. त्यानुसार सोमवारी (ता. २१) ठाण्यातील अन्न औषध प्रशासनाच्या वतीने सीबीडी बेलापूर, सेक्टर- १५ मधील शिवराज ढाब्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीत येथे तयार होणाऱ्या अन्नपदार्थांवर लक्ष ठेवण्यासाठी विहित शैक्षणिक पात्रताधारक पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली नसल्याचे आढळून आले. तसेच अन्नपदार्थ विक्रीसाठी तयार करताना वापरल्या जाणाऱ्या पाण्याची तपासणी करण्यात येत नसल्याचे तसेच अन्नपदार्थ बनवताना त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या अन्नपदार्थांची हाताळणी करणाऱ्या कामगारांची आरोग्य तपासणीही करण्यात आली नसल्याचे आढळून आले आहे. यामुळे हा ढाबा बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या निर्देशानुसार कोकण विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख, सहायक आयुक्त योगेश ढाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रश्मी वंजारी यांनी केली. कोणत्याही अन्नपदार्थाच्या गुणवता व दर्जाबाबत किंवा अन्न आस्थापनेबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्याबाबत १८००-२२२-३६५ या माहिती प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांकावर नोंदवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT