मुंबई

त्रंबकेश्वर महादेव मंदिर

CD

संदीप पंडित, विरार
मराठ्यांनी ज्या ठिकाणी विजय मिळविला तिथे वेगवेगळ्या देवतांची मंदिरे उभारली. वसई किल्ल्यातील हनुमान मंदिर असेल, गणपती मंदिर असेल किंवा वज्रेश्वरी मंदिर असेल. त्याचप्रमाणे पेशव्यांनी वसई जिंकली, त्यावेळी अर्नाळा किल्ल्यावरही मंदिराची निर्मिती केली. याचे संदर्भ देणारी ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध आहेत. ते मंदिर म्हणजे जंजिरे अर्नाळा किल्ल्यावरील त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर होय.

सध्या हे मंदिर पंचलिंगेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते. मूळ मंदिर नरवीर चिमाजी आप्पा यांनी वसई मोहिमेत जंजिरे अर्नाळा किल्ल्याची निर्मिती करत असताना सन १७३७ मध्ये बांधले. याबाबत असंख्य कागदपत्रे उपलब्ध आहेत. आता ग्रामस्थांनी मूळ मंदिराचा जीर्णोद्धार करून नवीन मंदिर उभारले आहेत.

सध्या मंदिराच्या आवारात श्री गणपती, जुन्या मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण दीपमाळ तसेच नंदी पाहण्यास मिळतात. किल्ले वसई मोहिमेचे प्रमुख श्रीदत्त राऊत यांनी सदर मंदिराची ऐतिहासिक मोडी कागदपत्रे सर्वप्रथम प्रकाशात आणली. पुरातत्त्व विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने सदर मंदिर आपले पुरातत्त्वीय अवशेष कायमस्वरूपी हरवून बसले आहे. पेशवे कालखंडाच्या शेवटापर्यंत सदर मंदिराच्या देखभालीसाठी विशेष धर्मादाय रक्कम नेमणूक करण्यात आलेली होती.

कसे जाल?
विरार स्टेशनला उतरून पश्चिमेला अर्नाळा गावापर्यंत रिक्षा, एसटी किंवा पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसने जाता येते. त्यानंतर होडीतून अर्नाळा किल्ल्यात जावे लागते. समुद्राच्या कुशीत असलेल्या या किल्ल्यावर जाताना एक वेगळाच आनंद मिळतो. पर्यटनाबरोबरच महादेवाचे दर्शन घेता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओमानमध्ये जहाजावर भारतीयाचा मृत्यू, प्लास्टिकमध्ये गुंडाळून थंड पाण्याच्या बाटल्यांनी झाकलं; मृतदेह सडू लागला, मदत मिळेना

Uddhav Thackeray: मातोश्रीवर बैठकीला ९ पैकी चौघेच आले, सर्वजण ठाकरेंसोबतच राऊतांचा दावा; तरीही ऑपरेशन टायगरची भीती

Latest Marathi News Live Update : नाशिक जिल्हयातील नागा-साक्या धरणाने गाठला तळ

Pune Market Yard: पुणे मार्केट यार्डमध्ये केशर आंब्याला १६७ रुपये प्रतिकिलो भाव; पाच वर्षांतील सर्वोच्च विक्रम

Thane News: थीम केक ठरला जीवघेणा! तीन वर्षांच्या चिमुकलीच्या पोटात धातूच्या पिना; ठाण्यातील खळबळजनक घटना

SCROLL FOR NEXT