मुंबई

आरोग्यदायी नारळ पाणी

CD

नेरूळ, ता. २६ (बातमीदार) : नारळाला कल्पवृक्ष मानले जाते. कारण नारळ हे अनेक रोगांवर औषध म्हणून गुणकारी आहे. नारळ हे ऊर्जेचे द्योतक आहे आणि त्याचा अनेक प्रकारे वापर केला जातो. नारळाचे फळ, त्याची पाने आणि अगदी केसही विविध प्रकारे वापरले जातात. त्यामुळे नारळ हे धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय पवित्र मानले जाते आणि पूजेत नारळाचा वापर केला जातो.
सकाळी तुम्ही नारळ पाणी पित असाल, तर तुमचे आरोग्य छान राहू शकते. रोज नारळ पाणी प्यायल्याने शरीरातील अनेक समस्या सहज दूर होतात. शिवाय नारळ पाणी शरीरासाठी फायदेशीर आहे. यामध्ये अनेक पोषकतत्त्वे असतात, जे शरीराला आतून मजबूत करतात. नारळाच्या पाण्यात एक नाही तर अनेक आजार दूर करण्याची क्षमता असते. नारळ पाणी हे उत्तम पेय आहे. नारळपाणी रोज प्यायल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती अधिक बळकट होते आणि त्वचादेखील तुकतुकीत राहते. नारळाच्या पाण्यात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅंगनीज, अँटिऑक्सिडंट्स, अमिनो अॅसिड आणि साइटोकिनिन्स यांसारखी विविध खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्स भरपूर असतात.


नारळपाणी पिण्याचे फायदे
१) एक कप नारळाच्या पाण्यात ६०० मिलिग्रॅम पोटॅशियम मिळते, ज्यामुळे मूत्रपिंडांना फायदा होतो.
२) नारळ पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.
३) वजन कमी करण्यास मदत होते. (नारळ पाण्यात बायोॲक्टिव्ह अँजाइम असतात. त्यामुळे शरीरातील मेटाबॉलिजम वाढण्यास मदत होते.)
४) नारळ पाण्यात अँटी-मायक्रोबिअल गुण असतात. त्यामुळे त्वचेवरील मुरुमे, त्वचेच्या समस्या, पिंपल्स यांच्याशी लढा देण्यास मदत मिळते. नियमितपणे नारळ पाणी प्यायल्याने फ्री रेडिकल्समुळे शरीराचे होणारे नुकसान टळते.
५) किडनी स्टोनवर प्रभावी
(किडनी स्टोनच्या आजारापासून लांब रहायचे असेल, तर शरीर हायड्रेटेड राहणे, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. नारळ पाण्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहरे पडतात. तसेच किडनी स्टोनच्या आजारातही नारळपाणी प्रभावी ठरते.)
६) पोटाच्या समस्या दूर होतात (पोटाच्या समस्या अनेकदा खराब पचन प्रक्रियेमुळे किंवा पाण्याच्या कमतरतेमुळे होतात. एक ग्लास नारळ पाणी शरीराला चांगले हायड्रेट ठेवते.)
७) गर्भवती महिलांकरिता उत्तम (नारळाचे पाणी गर्भवती महिलांना निर्जलीकरण होण्यापासून वाचवते आणि आजारपणासारख्या समस्यांविरुद्ध प्रभावी आहे.)
८) केसांचे संरक्षण करते (केसांच्या रोमांना बळकट करून नारळ पाण्यामुळे ही समस्या दूर होते आणि केसांना तोडण्यापासून रोखणारे लॉरिक ॲसिड मिळते. हे केसांना वाढण्यासदेखील मदत करते.)
९) संधिवातासारख्या समस्या रोज सुके खोबरे खाल्ल्याने टाळता येतात. वाळलेल्या नारळामध्ये अनेक खनिजे असतात, जी आपल्या संयोजी ऊतकांना मजबूत ठेवायला मदत करतात.

नारळपाणी पिण्याचे दुष्परिणाम

पोट बिघडले असेल, तर अशा वेळी नारळपाणी पिणे टाळावे. कारण नारळपाण्यामुळे शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण वाढते, यामुळे जुलाब होऊ शकतात. काही लोकांना नारळपाण्यामुळे सर्दी होते. उच्च रक्तदाबासाठी औषध खाणाऱ्या लोकांनी जास्त नारळपाणी पिऊ नये. नारळ पाण्यामध्ये ब्लडप्रेशर कमी करण्याचे गुणधर्म असतात. तसेच कोणाची शस्त्रक्रिया झाली असेल, तर त्यांनी नारळ पाणी पिणे टाळावे. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यामध्ये समस्या निर्माण होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1,500 अंकांनी खाली; कारण काय? कोणत्या शेअर्सला फटका?

IPL 2026: राजस्थान एक्स्प्रेसला अधिक संधी सातत्याचा अभाव असलेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आज सामना, कशी असेल प्लेइंग-११

Latest Marathi News Live Update : धाराशिवमध्ये शिवसेनेतील गटबाजी पुन्हा उफाळली,नजर कैदेत ठेवलेले शिवसैनिक आक्रमक

Gadchiroli News: सेंद्रीय शेती, किचन गार्डनच्या माध्यमातून नेहारपायली पुढे; गावाचा एकोपा यशाची गुरुकिल्ली; सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम

Pavangad Fort Shivling Discovery : पावनगडावरील दर्ग्याखालील ढिगाऱ्यात सापडलं एक फूट रुंदीचं पुरातन शिवलिंग, किल्ल्यावरील प्राचीन हिंदू संस्कृतीचा वारसा अधोरेखित!

SCROLL FOR NEXT