मुंबई

कोपरखैरणे भुयारी मार्गात अपघाताचा धोका

CD

वाशी, ता. २९ (बातमीदार) : ठाणे-बेलापूर मार्ग आणि कोपरखैरणे येथील अंतर्गत रस्त्याला जोडणाऱ्या भुयारी मार्गामधील गटारावरील लोखंडी जाळ्या चोरीला गेल्या आहेत. मुसळधार पावसात तर पाणी साचल्यानंतर वाहनचालकांना गटाराचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहे. पादचाऱ्यांनाही तेथून चालणे जिकिरीचे होत आहे.
कोपरखैरणे येथील भुयारी मार्गात पावसाळ्यामध्ये पाणी साचू नये. यासाठी भुयारी मार्गात गटार बांधण्यात आले. त्यावर पालिकेकडून जाळी बसवण्यात आल्या आहे; मात्र काही समाजकंटकांनी त्या चोरून नेल्या आहेत. गटारावर जाळी नसल्यामुळे अपघातही घडत आहेत. त्यामुळे या गटारावर लोखंडी जाळी बसवण्यात याव्यात, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

भुयारी मार्गातील गटारावर जाळ्या बसवल्या होत्या. काही समाजकंटकांकडून त्या चोरण्याचा प्रकार घडत आहे. भुयारी मार्गाची पाहणी करून जाळ्या बसवण्यात येतील.
- सुनील मोरे, विभाग अधिकारी, कोपरखैरणे

कोपरखैरणेवरून ठाणे-बेलापूर मार्गावर जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे. या भुयारी मार्गातून दोनच चारचाकी एका वेळी जाऊ शकतात. त्या बाजूने दुचाकीला जायचे असले तरी गटारावर जाळी नसल्यामुळे जाता येत नाही. पावसाळ्यामध्ये तर या ठिकाणी अपघाताचे प्रकारही घडत आहे.
- अंकुश नाईक, वाहनचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT