मुंबई

हातावरील टॅटूवरून आठ वर्षांनंतर अटक

CD

नालासोपारा, ता. २९ (बातमीदार) : हातावरील टॅटू आणि अस्पष्ट फोटोवरून आठ वर्षानंतर आरोपीला अटक करण्यात वसई गुन्हे शाखा ३ च्या पथकाला यश आले आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून २०१६ मध्ये साथीदारांसह २१ वर्षीय तरुणांची नायलॉन दोरीने गळा आवळून हत्या करून संशयित आरोपी फरार झाले होते. या प्रकरणी तुळिंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आले.

शिवबाबू ऊर्फ शिवा भैय्या जगतपाल निषाद असे अटक आरोपीचे नाव आहे. तो मूळचा उत्तरप्रदेशमधील राहणारा आहे. १७ मार्च २०१६ रोजी नालासोपारा पूर्वेतील वलईपाडा परिसरात जुन्या भांडणाच्या रागातून शिवा भैय्या आणि त्याच्या अन्य साथीदारांनी सुभाषचंद्र ऊर्फ भालू रामाशंकर गुप्ता (वय २१) याची नायलॉन दोरीने गळा आवळून हत्या केली होती. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोणीत भरून अज्ञात ठिकाणी फेकून संशयित आरोपी फरार झाले होते. या गुन्ह्यातील तीन आरोपींना या अगोदर अटक केले होते, तर मुख्य आरोपी हा फरार झाला होता. मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयातील विविध गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याच्या सूचना सर्व गुन्हे शाखा आणि पोलिस ठाण्याला मिळाल्या आहेत. यावरून या संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी वसई गुन्हे शाखेचे पथक ०३ चे प्रभारी पोलिस निरीक्षक शाहूराज रणविरे, सहायक पोलिस निरीक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे यांच्या पथकाने शोध घेतला. या फरार संशयित आरोपीच्या हातावर टॅटू असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. तसेच त्याचा एक अस्पष्ट फोटो पोलिसांना मिळाला होता. हाच धागा पकडून उत्तर प्रदेशमध्ये त्याला आठ वर्षांनंतर अटक करण्यात यश आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT