Childrens Sakal
मुंबई

Mumbai News : बचपन मनाओ, बढ़ते जाओ; बालपण साजरे करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी उपक्रम

८५ टक्के पेक्षा जास्त लोकांच्या मेंदूचा विकास ६ वर्षांच्या वयात होतो. ही सुरूवातीची वर्षच मुलांच्या जडणघडणीत, भावनिक विकासात महत्त्वाची भूमिका निभावतात.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - ८५ टक्के पेक्षा जास्त लोकांच्या मेंदूचा विकास ६ वर्षांच्या वयात होतो. ही सुरूवातीची वर्षच मुलांच्या जडणघडणीत, भावनिक विकासात महत्त्वाची भूमिका निभावतात. या वयोगटातील मुलांच्या सर्वांगिण आरोग्यावर होमारा सखोल आणि चिरस्थायी प्रभाव ओळखून एकस्टेप फाउंडेशनने 'बचपन मनाओ, बढ़ते जाओ' या उपक्रमाची सुरूवात केली आहे.

एकस्टेप फाउंडेशन हे ७५ पेक्षा जास्त संस्थांचे नेटवर्क असून हे जाळे आगामी काळात वाढणार आहे. नंदन निलेकणी, रोहिणी नीलेकणी आणि शंकर मारुवाडा हे एकस्टेप फाउंडेशनचे सहसंस्थापक आहेत. उपक्रमाची माहिती देताना रोहिणी नीलकेणी म्हणाल्या, 'बचपन मनाओ, बढ़ते जाओ’ हे बालपण साजरे करून भारतातील मुलांच्या शिकण्याच्या प्रवासाचे पालनपोषण करण्याचे एक सामाजिक मिशन आहे.

आपल्या देशाचे सर्वात लहान मुले हेच भविष्य आहेत. भारतात दरवर्षी सुमारे २५ दशलक्ष मुले जन्माला येतात. देशातील प्रत्येक मुलाला शिक्षणासाठी भक्कम पाया देण्याची संधी आमच्याकडे आहे'.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून लहानपणीच्या आनंदाला सामील करून घेणारी एक शॉर्ट फिल्म तयार करण्यात आली आहे. ज्यात मुलं शिकतात आणि वाढतात.या हृदयस्पर्शी शॉर्ट फिल्मचे उद्दिष्ट हे दर्शकांना 'बालपण साजरे करण्यासाठी' प्रोत्साहित करणे असल्याचे सहसंस्थापकांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indias Most Richest and Poorest CM: भारतातील सर्वात श्रीमंत अन् सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण? ‘ADR’ रिपोर्टमधून झाले उघड!

Latest Marathi News Updates: पुण्यात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

Velhe News : स्मशानभूमी अभावी निगडे खुर्द गावातील नागरिकांचे हाल; भर पावसात मृतदेह नीट जळण्यासाठी ग्रामस्थांनी धरली ताडपत्री

Pune Traffic : पुणे शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी; गणेशोत्सवाची खरेदी, शनिवारची सुटी आणि रस्त्यात आलेल्या मांडवांमुळे कोंडीत भर

Manchar News : मंचरजवळ गोरक्षनाथ टेकडीवर शनी अमावस्येला भाविकांची गर्दी; पहाटे चार पासून दर्शनासाठी रांगा

SCROLL FOR NEXT