मुंबई

स्त्री सामर्थ्याची ‘पिठोरी अमावस्या’

CD

उरण, बातमीदार
मातृपूजन म्हणजेच पिठोरी अमावस्या श्रावणातला शेवटचा दिवस. उरण, पनवेल, नवी मुंबई या परिसरात विशेषतः ठाणे व रायगड पट्ट्यात पिठोरी अमावस्या म्हणून साजरा केला जातो. उरण परिसरात जुनी लोकं पिठोरीला ‘पिठवर’ असेही संबोधतात. पिठोरीचे पूजन करण्यासाठी तसेच महाप्रसादाच्या भाताची खीर खाण्यासाठी गावागावातून भाविक दर्शनासाठी येतात.
मुलांना दीर्घायुष्य मिळावे, यासाठी पिठोरी अमावस्येचे व्रत करण्याची प्रथा आहे. दुपार सरल्यानंतर घरातील ज्येष्ठ व्यक्ती लहान मुलांना सोबत घेऊन रानात पिठोरीची पत्री आणायला जातात. ही पत्री दिंड्याच्या पानात आणली जाते. तेरडा, कागडा, कलई, लव, करडू, गोमती, नारळी, माका, हळदी-कुंकू इत्यादी वनस्पतींचा यात समावेश असतो. पिठोरी आणताना ‘हर हर महादेव’चा जयघोष करतात. सर्व रानातील वस्तू या पूजनात असतात. लव्यापासून बनवलेला कडा व अंगठी पूजा करणारा मुलगा हातात घालतो. रानातून आणलेल्या पत्रीरूपी पिठोरीला स्वच्छ धुतली जाते. त्याची दृष्ट काढून घरात घेतली जाते. संध्याकाळी सहा वाजल्यानंतर पिठोरीची पाटावर किंवा चौरंगावर प्राणप्रतिष्ठा केली जाते. या वेळी सर्वप्रथम विड्याच्या पानावर पूर्ण सुपारी ठेवून दुर्वा, फुले, अक्षदा वाहून गणेशपूजन केले जाते. त्यानंतर पिठोरीला साडीचोळी, खण-नारळ हळदी-कुंकू, वेणी-फणी देऊन ओटी भरली जाते. हळदीकुंकू वाहून पिठोरीचे पूजन केले जाते.
----------------------------------------
उकडीच्या मोदकांना महत्त्व
उकडीचे मोदक, केळी व काकडी पिठोरीला वाहिली जाते. केळी, काकडी व उकडीच्या मोदकाच्या प्रसादाला खूप महत्त्व असते. पिठोरीचे त्याच दिवशी रात्री बारा वाजता विसर्जन केले जाते. खरंतर पिठोरी उरण परिसरात गौरीसारखीच माहेरवाशीण म्हणून पुजली जाते. ज्या मुलीला वाटते, मला माहेरी कमी महत्त्व दिले जाते, ती मुलगी आपल्या बहिणीशी तुलना करत ‘ती काय गौरं मी काय पिठवर’ असे उपाहासाने म्हणते. इतर पूजेमध्ये विसर्जन दुसऱ्या दिवशी होते; मात्र पिठोरीचे त्याच दिवशी रात्री बारा वाजता विसर्जन केले जाते.
------------------------------------
सणामागची पौराणिक कथा
विदेहा नावाच्या स्त्रीचे दर श्रावण अमावास्येला झालेले मूल मृत्युमुखी पडत होते. या कारणासाठी पतीने तिला घराबाहेर हाकलून दिले. तेव्हा तिने कठोर तपश्चर्या केली. चौसष्ट देवतांनी तिला दर्शन दिले. विदेहावर प्रसन्न झालेल्या देवतांच्या कृपेमुळे तिला दीर्घायुषी असे आठ पुत्र झाले. अशा प्रकारे संततीरक्षणासाठी चौसष्ट देवतांच्या पूजनाबरोबरच स्त्रीला स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव पिठोरी अमावास्या करून देते. म्हणून ही अमावास्या महत्त्वाची आहे.
---------------------------------------
पिठाचे दिवे, दागिने
श्रावण अमावास्येच्या दिवशी दिवसभर घरातील स्त्रिया उपवास करतात. काही घरात संध्याकाळी आंघोळ करून तांदळाच्या राशीवर चौसष्ट सुपाऱ्या मांडून त्यावर चौसष्ट योगिनींचे आवाहन करतात. या व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करतात. यामध्ये उकडीचे मोदक, पिठाचे लाडू, पाटा-वरवंटा, पिठाचे दिवे, पिठाचे दागिने केले जातात. त्यावरून या तिथीला पिठोरी अमावास्या असे नाव पडले आहे. या दिवशी उरण परिसरात वरण-भात, उकडीचे मोदक, तांदळाची खीर, वालाचे बिरडे, अळूची देठ घालून वाटाण्याची भाजी, असा साधासा बेत असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT