मुंबई

बेपत्ता बालिकेचा मृतदेह प्लास्टिक ड्रममध्ये

CD

भिवंडी, ता. १५ (बातमीदार) : तीन दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या सहा वर्षांच्या मुलीचा मृतदेह शुक्रवारी (ता. १५) एका बंद खोलीतील प्लास्टिकच्या ड्रममध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुलीच्या मानेवर गळा दाबल्याच्या खुणा आढळल्या असून पोलिसांनी मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
फेणेगाव येथील बाबा शाळेजवळ पालकांबरोबर राहणारी सहा वर्षांची मुलगी बुधवारी (ता. १३) दुपारी १२ वाजता घराजवळ खेळत असताना अचानक बेपत्ता झाली होती़. याबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपहृत मुलीचा पोलिस शोध घेत असताना शुक्रवारी दुपारी त्याच परिसरात एका बंद खोलीतून उग्र वास येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बंद खोलीचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून शोध घेत असताना खोलीत ठेवलेल्या प्लास्टिकच्या छोट्या ड्रममध्ये बेपत्ता मुलीचा मृतदेह आढळून आला. मृत मुलीच्या मानेवर आढळलेल्या खुणांवरून मुलीचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती भिवंडी शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतन काकडे यांनी दिली.

-------------
शवविच्छेदन अहवालानंतर तपासाला गती
हत्येपूर्वी मुलीसोबत घडलेल्या घटनेची माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शहर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मृत मुलीचे वडील यंत्रमाग चालवतात; तर आई गोदामात कामाला होती. घरात असलेल्या बालिकेच्या एकटेपणाचा फायदा घेत तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : "पांडुरंगा, सर्वांना सुखी ठेव, चांगला पाऊस पडू दे..."; CM फडणवीसांसोबत महापूजा केल्यानंतर मानाच्या वारकऱ्याचे विठुरायाला साकडे

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

SCROLL FOR NEXT