मुंबई

पेणची गणेशविद्या पोहचली युरोप खंडात

CD

पेण, ता. १७ (बातमीदार) : युरोप खंडातील प्रत्येक शहरात अनेक नामवंत संग्रहालय आहेत. या सर्व संग्रहालयात आशिया खंडातील एक स्वतंत्र दालन असते. अशा या संग्रहालयातर्फे गणेशोत्सवाचेही आयोजन केले जाते. नुकतेच पेणचे ख्यातनाम मूर्तिकार व व्यावसायिक कल्याण मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत देवधर यांना मूर्ती कलेचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी निमंत्रित केले होते. स्वित्झर्लंडमधील झुरीच या शहरातील रीट बर्ग या प्रसिद्ध संग्रहालयाचे जर्मन व्यवस्थापक योहानांन्स बेस्टज यांच्या निमंत्रणावरून देवधर हे मार्गदर्शन करण्यासाठी गेले होते.
देवधर यांनी रिट बर्ग संग्रहालयात दहा ते अठरा वयोगटातील मुलांसाठी गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा घेतली. सर्वप्रथम त्यांनी मातीच्या गणेशमूर्ती तयार करून दाखवल्या. त्यानंतर या मुलांना छोटे साचे देऊन मूर्ती तयार करून घेतल्या. मूर्तीची कलाकुसर दागिने व मूर्ती रंगवण्याचे प्रशिक्षणही त्यांनी तेथील मुलांना दिले. या कार्यशाळेत झुरीच शहरातील मुलांनी २५ ते ३० गणेशमूर्ती तयार केल्या. त्यापैकी एका गणेशमूर्तीची भारतीय परंपरेनुसार पूजा करून स्थापनाही करण्यात आली. पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा करून देवधर यांच्या हस्ते विसर्जन सोहळा भारतीय पद्धतीनुसार केला.

परदेशात ठिकठिकाणी कार्यशाळा
देवधर यांनी झुरीच शहराप्रमाणेच जर्मनीतल्या बर्लिनमधील पॅथॉलॉजी संग्रहालय, हॉलंडमधील अमस्टर डॅम शहरातील कीट टॕपिन संग्रहालय आणि स्पेनमधील सांस्कृतिक संग्रहालयात कार्यशाळा घेतली. तेथील मुलांना गणपती तयार करणे, साचे बनवणे, मूर्तीची कलाकुसर आणि मूर्ती रंगवण्याचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर स्विझरलँडमधील बासल शहरातील कोनस्ट या संग्रहालयातही निमंत्रित करण्यात आले. तेथेही प्रशिक्षण दिल. तसेच अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात संग्रहालयातील नामांकित चित्रकार सीओना बेन्झामीन यांच्या निमंत्रणावरून त्यांनी आयोजित केलेल्या प्रदर्शनात देवधर सहभागी झाले होते. युरोप खंडात भारतीय विविध सणाबद्दल अत्यंत कुतूहल आणि कौतुक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT