मुंबई

पेसा अंतर्गत शिक्षक भरतीसाठी ७७३ उमेदवार पात्र

CD

पालघर, ता. २० (बातमीदार) : पालघर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागेसाठी ‘पेसा’ अंतर्गत दोन हजार १९४ रिक्त पदांपैकी १ हजार तीनशे अठरा पदे भरण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील स्थानिक आदिवासी ‘पेसा’ क्षेत्रातील परीक्षा दिलेल्या २,५५६ उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीनंतर ७७३ उमेदवार पात्र ठरले आहेत. उमेदवारांची ही अंतिम यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्रसिद्ध केलेल्या यादीतील उमेदवाराला हरकतीसाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली असून या संदर्भातील प्राप्त हरकती तपासून अंतिम यादी प्रसिद्धी केली जाणार आहे. ‘पेसा’ मध्ये नकारात्मक प्रतिसाद नोंदवणाऱ्या उमेदवारांची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांची मान्यता घेऊन पुणे येथे शिक्षण आयुक्त कार्यालयास सादर करण्यात येणार आहे. या भरती संदर्भातील प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली जात असून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही सुरू आहे. उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र ‘पेसा’ कक्ष सुरू करण्यात आला आहे. शिक्षकांची यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार असल्याने उमेदवारांना जिल्हा परिषदेत येण्याची गरज भासणार नाही. तसेच अपात्र उमेदवारांची अपात्र होण्याची कारणे यादीत नमूद असतील, तसेच त्रुटी पूर्ततेसाठी तीन कार्यालयीन दिवस वेळ देण्यात येणार आहे, असे शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग शेषराव बडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

Wimbledon 2026: यानिक सिनरचा डबल धमाका! सलग दुसऱ्यांदा उंचावली ट्रॉफी, ३ तास ४६ मिनिटांचा थरारक सामना...

Medha Manjrekar Cancer: मेधा मांजरेकरांच्या कॅन्सरवर लेक सईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली- आई तू खूप...

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मोठा धक्का ! ९२ लाख महिलांची नावे वगळली; 'ही' मोठी कारणे आली समोर

SCROLL FOR NEXT