मुंबई

अंधेरीत बारा ज्योतिर्लिंग पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

CD

अंधेरीत बारा ज्योतिर्लिंग पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
प्रभादेवी, ता. २७ (बातमीदार) ः गणेश भक्तांसह नागरिकांना बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडावे, यासाठी अंधेरी कामगार नगर येथील अंधेरीचा सम्राट म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंडळाने यंदा बारा ज्योतिर्लिंग असलेला देखावा साकारला आहे. हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
अंधेरी पश्चिम कामगार नगर येथील कामगार नगर आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील तरुणांनी आठ दिवस अहोरात्र मेहनत घेऊन स्वखर्चातून हा देखावा उभारला आहे. श्री केदारनाथ, मल्लिकार्जुन, रामेश्वर, वैद्यनाथ, भीमाशंकर, नागेश्वर, त्र्यंबकेश्वर, ओंकारेश्वर अशी बारा ज्योतिर्लिंग या देखाव्यातून दाखविण्यात आली आहेत. त्यामुळे या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी परिसरातून गर्दी होत आहे. मंडपाच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्योतिर्लिंग त्यानंतर हातात कमंडलू आणि त्रिशूळ घेऊन उभी असलेली भव्य शिवरूपी गणेशाची मूर्ती पाहून मन प्रसन्न होते. अंधेरी उपनगरातील हे सर्वात जुने मंडळ असून यापूर्वीही त्यांनी राम अवतार, गुंफा यांसारखे ऐतिहासिक व विविध प्रकारचे देखावे साकारले आहेत.
..............................................

दरवर्षी गणेशोत्सवात काही तरी वेगळे करण्याचा मंडळाचा नेहमीच प्रयत्न असतो. देखावा पाहण्यासाठी दहा दिवसांत राजकीय नेते, सेलिब्रिटी, सामाजिक कार्यकर्ते तसेच परिसरातल्या रहिवाशांसह बाहेरून नागरिकांची गर्दी होत असते.
- सुशील राजेसावंत, पदाधिकारी, कामगार नगर आणि परिसर सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway: कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेसचे डबे वाढणार, लांब पल्ल्याचा प्रवास आरामदायी होणार! रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Marriage Blessing Temple India : अजूनही 'सिंगल' आहात? लग्न ठरत नाहीये? 'या' प्राचीन मंदिरात कमरेला माळ बांधून फक्त 9 प्रदक्षिणा मारा, मग लग्न ठरलंच म्हणून समजा...!

Gudi Padwa 2026: यंदा गुढी पाडवा 18 की 19 मार्चला? जाणून घ्या तारीख, वेळ, शुभ मुहूर्त अन् सणाचे महत्त्व

Love Marriage : 'या' ठिकाणी मुलींच्या लव्ह मॅरेजला फूल पर्मिशन; आवडला पुरुष की कर लग्न! वाटेल तेव्हा घटस्फोट, शेजारील देशाशी आहे संबंध

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये दोन वर्षांच्या चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत बुडून मृ्त्यू

SCROLL FOR NEXT