मुंबई

टीबीची औषधे उपलब्ध करा!

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : एकीकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय टीबीची औषधे उपलब्ध असल्याचा दावा करत आहे; तर दुसरीकडे मुंबईतील अनेक ड्रग रेझिस्टंट टीबीच्या रुग्णांना अद्यापही डॉट केंद्रांवर सायक्लोसरीन औषध मिळत नाही. सरकारने औषधे कागदावर न देता डॉट केंद्रांवर उपलब्ध करून दिली तर बरे होईल, असे क्षयरोग रुग्ण व कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
मुंबईत जूनपासून ड्रग रेझिस्टंट टीबी रुग्णांच्या औषधांचा तुटवडा आहे. यासंदर्भात कार्यकर्त्यांनी आवाज उठवला आहे. देशात आणि परदेशातील क्षयरुग्णांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या एकूण ११३ स्वयंसेवी संस्थांनी औषधांचा तुटवडा दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिले आहे. टीबी रुग्णांसाठी काम करणारे कार्यकर्ते गणेश आचार्य म्हणाले, की सरकार कागदावर औषधे उपलब्ध असल्याचे सांगत आहे; परंतु प्रत्यक्षात सायक्लोसरीन औषध अद्याप उपलब्ध नाही. सरकार त्रस्त असलेल्या रुग्णांची चेष्टा करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: फेरीवाल्यांसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन आणि क्यूआर कोड लायसन्स अनिवार्य; पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

IPL 2026: शुभमन गिलने विराटचा तो विक्रम मोडत नवा इतिहास घडवला; बटरनेही किंग कोहलीच्या यादीत मिळवलं स्थान

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार हा अवमान नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, चौकशीची मागणी करणाऱ्या महिलेवरील गुन्हा रद्द

Free FASTag Money: आता मिळणार 1,000 रुपयांचा FASTag फ्री! फक्त एक काम करायचं, सरकारची नवी भन्नाट योजना

शरद पोंक्षेंना तिसऱ्या स्टेज कॅन्सरची कल्पनाच नव्हती; पत्नीनं सांगितला किस्सा, स्वत: केले आयुर्वेदिक उपचार

SCROLL FOR NEXT