मुंबई

साथीच्या आजारांमुळे रुग्णालये हाऊसफुल

CD

खारघर, ता.२ (बातमीदार) : गेल्या काही दिवसांपासून पावसाचा लपंडाव सुरू असल्याने त्याचा विपरीत परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. खारघर शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंगी, हिवताप, ताप, खोकला अशा साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून खारघरमधील खासगी तसेच शासकीय रुग्णालये रुग्णांनी भरली असल्याचे चित्र आहे.
खारघर वसाहतीत आजही अनेक भागांत कचऱ्याचे ढीग, मलनिस्सारण वाहिन्या भरल्याने रस्त्यावरून दुर्गंधीयुक्त पाणी वाहताना दिसून येते. काही भागात पाण्याचा निचरा होत नाही. रस्ते, गटारे तुडुंब भरली आहेत. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढल्याने ताप, हिवतापाच्या रुग्णांत वाढ होताना दिसत आहे. ऑगस्ट महिन्यात खारघरमध्ये डेंगीचे ३२ रुग्ण आढळून आले होते; तर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबरमध्ये खारघरमधील नागरी आरोग्य आणि खासगी रुग्णालयांत हिवतापाचे ४५, तर डेंगीच्या ५४ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे साथीच्या आजारांनी त्रस्त नागरिकांची संख्या वाढतच असल्याने पनवेल महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
------------------------------------------
विविध तपासण्यांमुळे खिशाला झळ
खारघर परिसरात काही दिवसांपासून डेंगी, सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणे, तांबड्या, पांढऱ्या पेशी कमी होणे, अशक्तपणा यामुळे शहरातील नागरिक बेजार आहेत. दवाखान्यात तपासणी अथवा भरती झाल्यानंतर रक्त व लघवी तपासण्याचा सल्ला दिला जात असल्याने पॅथॉलॉजिकल लॅबचा व्यवसाय तेजीत आला आहे. दोनशे रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत तपासण्यांचे दर असल्याने खिशाला झळ बसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

CJI Surya Kant: ''..तर राजीनामा द्या!'' काँग्रेसची सरन्यायाधीशांवर पोस्ट, गदारोळ होताच पोस्ट डिलीट

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT