मुंबई

गणेश नाईक यांच्यावर शिवसेनेच्या शिंदे गटांचे गंभीर आरोप

CD

नवी मुंबईच्या विकासात
गणेश नाईकांचा खोडा

शिवसेना शिंदे गटाचा आरोप

वाशी, ता. ४ ( बातमीदार) : राज्यात भाजप व शिवसेना शिंदे गट एकत्र नांदत असले तरी स्थानिक राजकारणात या दोन्ही पक्षांचे खटके उडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नवी मुंबईचा विकास होत आहे. भाजपचे नेते गणेश नाईक त्यामध्ये खोडा घालत आहेत, असा आरोप शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. यापुढे विकासकामांत खोडा घातल्यास त्यांच्याविरोधात मोर्चा काढण्याचा इशारा देतानाच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले, संपर्कप्रमुख किशोर पाटकर आणि अशोक गावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आज भाजपचे नेते गणेश नाईक यांना लक्ष्य केले आहे. नवी मुंबईतील अनेक वर्षांपासून झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास रखडलेला आहे. यासाठी नुकतेच झोपडपट्टी पुनर्वसन विभागातर्फे सर्वेक्षण सुरू झाले आहे, पण अधिकाऱ्यांना धमकावून येथील सर्वेक्षण बंद केल्याचा आरोप चौगुले यांनी केला आहे. आमचा भाजपावर राग नसून स्थानिक नेत्यांवर असल्याचेदेखील चौगुले यांनी यावेळी स्पष्ट केले. वाशी येथे पुनर्विकास सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकाम व्‍यावसायिकांकडे टक्केवारी मागितली जात आहे, असा आरोप संपर्कप्रमुख किशोर पाटकर यांनी केला. तर शिवसेनेचे अशोक गावडे यांनी नेरूळ येथील इमारतीचे पुनर्विकास करताना सिडकोच्या अधिकाऱ्यांना धमकावून लीज डीड करून देत नसल्याचा आरोप केला आहे.
----
अधिकाऱ्यांना ईडी, ‘प्राप्तिकर’च्या धमक्या
गणेश नाईक यांना स्वत:च्या गावाचा विकास करता आलेला नाही. आता नवी मुंबईतील सुरू असलेल्या विकासकामांत ते अडथळा निर्माण करत आहेत. अधिकाऱ्यांना ईडी, इन्कम ट्रक्सची भीती घातली जात आहे, असेही चौगुले म्हणाले. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात ‘मिशन ४५’ राबवण्याचा मानस आहे. मात्र, स्थानिक राजकीय नेते कुरघोडी करण्यात व्‍यग्र असल्याची खंत चौगुले यांनी व्‍यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : सूर्यकुमार यादवसाठी दरवाजे अजूनही खुले... माजी कर्णधाराचे टीम इंडियात पुनरागमन शक्य... जाणून घ्या, कसं!

RBI News: WhatsApp वर RBI चा मेसेज आला? खिशातील रुपया आता मोबाईलमध्ये! डिजिटल रुपया म्हणजे काय आणि तो कसा वापरायचा जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय पेरांबूरला भेट देत आहेत

IND vs ENG: 'Lords' वर देव! भारतीय महिला खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी पोहोचला सचिन तेंडुलकर Video

Devkund News: देवकुंड डोहात बुडालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह 50 फूट खोल डोहात सापडले; अवघ्या पंधरा मिनिटात रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

SCROLL FOR NEXT