मुंबई

कल्याण फेरीवाला प्रकरणी आमदार आक्रमक

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ५ : कल्याण येथे एका विद्यार्थ्याला अरेरावी करत मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या फेरीवाल्यांना राजू पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला होता. याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात सहा ते सात जणांवर गुन्हा दाखल झाला होता. यावर बुधवारी (ता. ४) आमदार राजू पाटील यांनी थेट पोलिस ठाणे गाठले. फेरीवाले तक्रार देण्यास तयार नाहीत तर दबाव का टाकला जातो, असा सवाल करत आम्ही ठाकरे गट नाही असे पोलिसांना खडसावले. फेरीवाल्यांना हटवले नाही तर त्यांना अभय देणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना ठोकू, असा इशारादेखील दिला.
कल्याण स्कायवॉकवर मराठी भाषेविषयी अपशब्द वापरणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसैनिकांनी बेदम मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केले होते. सोशल मीडियावर या प्रकरणाचा हा व्हिडीओ व्हायरल होताच याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी सहा ते सात कार्यकर्त्यांविरोधात २४ तासांनंतर फेरीवाल्याचा जबाब नोंदवून गुन्हा नोंदवला. यामुळे संतप्त झालेल्या आमदार राजू पाटील यांनी या संबंधित कल्याण महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांची भेट घेतली. यावेळी ज्या फेरीवाल्याला मारहाण झाली होती. त्या फेरीवाल्याला पोलिसांच्या समोर उभे केले. मात्र पोलिसांवर आरोप होत असल्याने पोलिसांनी त्या फेरीवाल्याला कार्यालयाच्या बाहेर काढले. यावरून वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाणे यांच्या कार्यालयातच पाटील आक्रमक झाले. त्यानंतर पोलिसांनी नमतेपणा घेत माघार घेतल्यावर हे प्रकरण शांत झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 : राज्यात १ मे पासून जनगणना, विचारले जाणार 'हे' प्रश्न; चुकीची माहिती दिल्यास होणार तब्बल 'इतका' दंड

Latest Marathi News Live Update : पाषाण तलावातील मृत मासे प्रकरण! महापौरांचा दौरा, प्रदूषण रोखण्यासाठी तातडीचे आदेश

गरोदर असूनही ‘राका’मध्ये दिसणार दीपिका पादुकोण करणार अ‍ॅक्शन सीन ! अभिनेत्रीची विशेष मेहनत

‘मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया’मध्ये मराठमोळ्या श्वेता साकोडेची दमदार एन्ट्री; महाराष्ट्रीयन पदार्थांनी जिंकली परीक्षकांची मनं

Management Education: मॅनेजमेंट शिक्षणातील 'जेंडर गॅप': महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी बिझनेस स्कूल्स उचलत आहेत मोठी पावले

SCROLL FOR NEXT