मुंबई

नवरात्री उत्सवात दिव्यात महिला पोलिसांची संख्या वाढवा : ज्योती पाटील

CD

ठाणे : नवरात्रोत्सवात दिवा शहरात महिला पोलिसांची संख्या वाढवून निर्भया पथकामार्फत पेट्रोलिंग सुरू ठेवण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या दिवा महिला मंडळ अध्यक्ष ज्योती पाटील यांनी केली आहे. दिवा शहरात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन उपलब्ध असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर येणारा ताण याचा विचार करून या काळात दिवा पोलिस चौकीअंतर्गत महिला पोलिसांची संख्या वाढवण्यात यावी. तसेच निर्भया पथकामार्फत संपूर्ण दिवा शहरात गस्त घालण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. नवरात्रोत्सवामध्ये विविध ठिकाणी विराजमान झालेल्या देवीच्या दर्शनासाठी महिला, मुली मोठ्या संख्येने बाहेर पडत असतात. नवरात्रोत्सव हा आनंदचा सण असल्याने गरबा पाहण्यासाठीसुद्धा अनेक महिला जात असतात. महिलांची सुरक्षितता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने शहरातील वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊन पोलिस मनुष्यबळ वाढवण्यात यावे, असे ज्योती पाटील यांनी म्हटले आहे.
…..
गणेशपुरीत सांस्कृतिक कार्यक्रमाचा जल्लोष
वज्रेश्वरी (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी येथे बाल गोपाळ मित्र मंडळ आणि गुरुदेव सिद्धपीठ आश्रम गणेशपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद मराठी शाळेत मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमात परिसरातील कलाकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी भरतनाट्यम, कोळी गीते, आईचा गोंधळ, सोलो डान्स, ग्रुप डान्स, मंगळागौर, लावणी, भारूड आदी कला सादर करण्यात आल्या. या कार्यकमात तीस जणांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून गायक व संगीतकार आत्माराम पाटील, संतोष पाडेकर यांनी काम पाहिले. यामध्ये विविध आकर्षक बक्षिसे व पारितोषिके ठेवण्यात आली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून गुरुदेव सिद्धपीठचे शिवप्रसाद राऊत, रमेश आवरे, मंडळाचे दीपक शेट्टी, भूषण हळदणकर यांच्या हस्ते कृतुजा घरत हिला प्रथम क्रमांकाचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले; तर सोलो डान्स रीतेश पांढरे यांना द्वितीय बक्षीस पारितोषिक, तसेच ग्रुप डान्स गणेशपुरी यांना तृतीय पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
…..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT