मुंबई

लोकसभा-विधानसभा निवडणुका महायुती म्हणून लढणार

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ हून अधिक जागा जिंकण्यावर आमचा भर असेल. त्यानंतर विधानसभा निवडणुकीसह आम्ही तिघे एकत्रित महायुती म्हणून लढू, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिली.
ठाण्यातील एका हॉटेलमध्ये रविवारी रात्री (ता. ९) शिवसेनेच्या प्रवक्त्यांचे प्रशिक्षण शिबिर पार पडले. त्याला मुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. राज्यात आमच्या तिघांचे चांगले काम सुरू आहे. सध्या राज्याचा जो वेगाने विकास होत आहे, यात आमच्या तिघांची टीम अत्यंत उत्तम काम करत आहे. यापूर्वी राज्याच्या विकासासाठी चांगले काम करण्याचा अनुभव मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहिला आहे. त्यामुळे फडणवीस आणि आम्ही धोरणात्मक निर्णय, जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहोत. आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी एक टीम म्हणून देवेंद्र फडणवीस आमच्यासोबत असणे आवश्यक आहे. तसेच त्यानंतरची पुढची विधानसभेची लढाईही आम्हीच जिंकणार असून आम्ही एकदिलाने काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्याच्या विकासासाठी चांगले निर्णय घेण्यासाठी फडणवीस यांच्याकडे असलेला अनुभव आवश्यक आहे. आजच्या घडीला दिल्लीत खूप मोठे नेते आहेत. तिथे फडणवीस जाणार का, हा त्यांचा वैयक्तिक तसेच त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाचा निर्णय असेल. त्याचप्रमाणे आमदार संजय शिरसाठ यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत आधीच खुलासा केला असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT