मुंबई

रिक्षा चालकाने व त्याच्या साथीदाराने महिलेच्या गळ्यातील पाऊण लाख रुपये किंमतीचे दागिने लुटले

CD

रिक्षाचालकाने महिलेला लुटले

नवी मुंबई, ता. १३ (वार्ताहर) : कामोठे येथून रिक्षाने वाशी येथे जात असलेल्या एका महिलेला रिक्षाचालकाने व त्याच्या साथीदाराने रिक्षात सीएनजी भरण्याच्या बहाण्याने सीबीडीतील पारसिक हिलवर निर्जनस्थळी नेले. तेथे महिलेच्या गळ्यातील पाऊण लाख रुपये किमतीची सोन्याची चेन लुटून दोघांनी पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. सीबीडी पोलिसांनी या घटनेतील रिक्षाचालक व त्याचा साथीदार यांच्याविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

कामोठे येथे राहणाऱ्या नियती पोमेंडकर (वय ४७) या १० ऑक्टोबरला वाशी येथे कामानिमित्त जात होत्या. त्यांनी दुपारी दीडच्या सुमारास कामोठे येथून रिक्षा पकडली होती. या रिक्षात एक प्रवासी पूर्वीपासून बसला होता. वाशीच्या दिशेने जात असताना रिक्षाचालकाने पाठीमागे बसलेल्या आपल्या साथीदाराला रिक्षातील सीएनजी संपल्याचा बहाणा करून पंपाबाबत विचारपूस केली. त्याने सांगितल्याप्रमाणे रिक्षा पारसिक हिलवर नेली. पोमेंडकर यांना शंका आल्याने त्यांनी कुठे घेऊन जात आहे, अशी विचारणा रिक्षाचालकाला केली. त्यानंतर चालकाने रस्त्यामध्ये रिक्षा थांबवली आणि पाठीमागे बसलेल्या त्याच्या साथीदाराने पोमेंडकर यांच्या गळ्यातील १३ ग्रॅम वजनाची ७६ हजार ७०० रुपये किमतीची सोन्याची चेन खेचून पारसिक हिल येथील झुडपात पलायन केले. त्यानंतर रिक्षाचालकानेही पोमेंडकर यांना एकटीला सोडून पलायन केले. पोमेंडकर यांनी गुरुवारी वडिलांसह सीबीडी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT