मुंबई

गटप्रवर्तक, आशांचे आंदोलन

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : वैयक्तिक मोबाईलवर कराव्‍या लागणाऱ्या अतिरिक्त कामामुळे त्रस्त गटप्रवर्तक आणि आशा कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सामूहिक राजीनामा आंदोलन केले. यानंतर जिल्हा आरोग्य अधिकऱ्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत ऑनलाईन सक्ती न करण्याबरोबरच बजाविण्यात आलेल्या नोटिशीवर कारवाई न करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाच्या वतीने देण्यात आली.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्यात सुमारे दोन हजार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत. गटप्रवर्तक व आशा स्वयंसेवकांची कामाची वेळ व कामाचे स्वरूप नियुक्तीपत्र देताना ठरविण्यात आले आहे. जिल्हा व तालुका आरोग्य कार्यालयाकडून गटप्रवर्तकांना त्यांच्या ठरलेल्या कामाव्यतिरिक्त, त्यांना खासगी मोबाईलवर ऑनलाईन कामे करण्याची सक्ती केली जात आहे. जिल्ह्यातील सर्व गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांनी त्यांना देण्यात आलेल्या बेकायदा नोटीसविरोधात शुक्रवारी जिल्हा आरोग्य कार्यालयावर जमा होऊन आंदोलन केले. या वेळी सामूहिक राजीनामे देण्याची तयारी केली होती. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या दालनात चर्चा केल्यानंतर ऑनलाईन कामाची सक्ती न करणे, नोटिशीवर कारवाई न करणे, दिवाळीपूर्वी गटप्रवतर्कांना दिवाळी बोनस अदा करण्यासंदर्भातील प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करणे, तसेच गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन अदा करण्यासंदर्भात शिफारस करणार असल्याचे आश्वासन दिल्याचे महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाचे सरचिटणीस भगवान दवणे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT