मुंबई

नालासोपारा शस्त्रसाठाप्रकरणातील मुख्य आरोपीला जामीन

CD

नालासोपारा, ता. १३ ( बातमीदार) : नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला वैभव राऊत याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. वैभव जामिनावर सुटल्यानंतर गुरुवारी (ता. १२) रात्री उशिरा घरी आल्यानंतर त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

वैभव राऊत याला २०१८ मध्ये दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नालासोपारा येथून अटक केली होती. राऊत हा सनातन संस्थेच्या साधक असून नालासोपाऱ्यातील त्याच्या घरातून एटीएसने स्फोटक पदार्थ जप्त केली होती. दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप त्याच्यासह इतर आरोपींवर लावण्यात आला होता. जानेवारी २०२३ मध्ये राऊत याने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केल्यानंतर तो रात्री घरी परतला आहे. त्याच्या घरातून २० जिवंत गावठी बॉम्ब, दोन जिलेटिन कांड्या, ४ इलेक्ट्रिक डिटोनेटर्स, २२ नॉन इलेक्ट्रिक डिटोनेटर्स, एक लिटरच्या दोन बाटल्या तसेच वेगवेगळ्या स्फोटक पावडरची पाकिट एटीएसला सापडली होती. नालासोपाऱ्यात वैभव राऊतच्या घरी अवैध शस्त्रसाठा हस्तगत केल्यानंतर वैभव राऊतसह सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर यांना अटक केली होती. त्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने या प्रकरणात चौथा आरोपी म्हणून जालना येथून श्रीकांत पांगरकरला अटक केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

Simple Footpath Wedding: अमरावतीत उड्डाणपुलाखाली फुटपाथवर रंगला साधेपणाचा अनोखा विवाहसोहळा; सोशल मीडियावर कौतुकाची लाट

Successful National Lok Adalat: गंगापूर जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी; १०७ प्रकरणांचा तडजोडीने निपटारा, ८० लाख रुपयांची वसुली

SCROLL FOR NEXT