मुंबई

कांदा-बटाटा बाजाराचे रूपडे पालटणार

CD

वाशी, ता.१५ (बातमीदार)ः मुंबई कृषी उत्पन्न बाजाराच्या पुनर्बांधणीचा आराखडा अंतिम टप्प्यात आला आहे. या आराखड्याचे पुढील आठवड्यात पणन मंत्र्यांसमोर सादरीकरण होणार आहे. त्यामुळे या आराखड्याच्या माध्यमातून व्यापाऱ्यांच्या मागण्या आणि खर्च याची सांगड घालण्याचा प्रयत्न होणार असल्याने पुनर्बांधणीचा विषय लवकरच निकाली निघणार आहे.
वाशीतील घाऊक बाजार समितीच्या मुख्य कांदा बटाटा बाजाराची बांधणी १९८० मध्ये झाली आहे. यामुळे १५ वर्षांपासूनच हे बांधकाम जीर्ण होऊ लागले आहे. बाजाराच्या पुनबांधणीसंदर्भात व्यापारी, बाजार समिती यांच्यात एकमत होत नसल्याने पुनबांधणीचा हा विषय न्यायालयात गेला. मात्र, एकापाठोपाठ चार याचिका दाखल झाल्याने कोणताही तोडगा निघाला नसल्याने कांदा-बटाटा बाजाराची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असून टेकू लावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून बाजाराच्या पुनर्बांधणीच्या विषयाला गती मिळाली असून ‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ या तत्त्वावर सध्या बाजाराची बांधणी करण्याचा प्रयत्न बाजार समितीकडून सुरू आहे. पण यासाठी लागणारा पैसा खर्च करण्यास बाजार समिती तयार नाही. तर, दुसरीकडे अधिक एफएसआय देऊन बाजाराची बांधणी व्हावी, असे बहुतांश व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकाला बाजारातील काही भाग देऊन बाजाराची उभारणी करण्यावर भर आहे.
-----------------------------------------
‘या’ सुविधांचा अंतर्भाव
- कांदा बटाटा बाजारातील १२ हजार चौरस मीटरचा भूखंड बांधकाम व्यावसायिकाला विकसित करण्यासाठी दिला जाणार आहे. त्यात व्यापाऱ्यांसाठी गाळे, लिलावगृह, प्रशासकीय इमारतीची उभारणी केली जाणार आहे. शिवाय ४०० चारचाकी गाड्यांचे पार्किंग, दोन हजार दुचाकींचे पार्किंग, शेतकरी निवास, बैठकीचे सभागृह याचे नियोजन केले जाणार आहे.
- या सोयी अंतर्भूत करूनच आराखडा तयार केला आहे. आता बाजारातील व्यापारी गाळे ६५० चौरस फुटांचे आहेत. त्यात व्यापाऱ्यांना आणखी १०० फूट वाढीव जागा हवी आहे. व्यापाऱ्यांना त्यांच्या गाळ्यांच्या जागेवर दोन मजले वाढवण्याची चाचपणी सुरू आहे.
------------------------------------------
बाजाराच्या पुनर्बांधणीसाठी अनेक बांधकाम व्यावसायिक इच्छुक आहेत. मात्र, व्यापाऱ्यांच्या मागण्या आणि प्रत्यक्षात बाजाराची जागा यांचा ताळमेळ बसत नसल्याने बांधकामाचा विषय निकाली निघत नव्हता. मात्र, तयार आराखड्यावर आता अंतिम शिक्क्कामोर्तब बाकी आहे.
- अशोक वाळुंज, संचालक, कांदा बटाटा बाजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PCMC ACB raid on Chief Engineer : पिंपरी-चिंचवड महापालिकेत ACB ची मोठी कारवाई! थेट मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयातच धाड; ठेकेदाराकडून लाच मागताना बड्या अधिकाऱ्याला बेड्या

चंद्राच्या राशीबदलामुळे ‘या’ ३ राशींनी जरा जपून राहावं; बँक बॅलन्सला धोका? पैशांचं नुकसान टाळण्यासाठी कोणत्या राशींनी राहावं सावध?

Satej (Bunty) Patil on Hasan Mushrif Gokul : 'त्यांना गोकुळ दूध संघच बंद पाडायचाय!' हसन मुश्रीफांच्या टीकेनंतर बंटी पाटलांचा थेट आरोप, 'सहकारातील काळा दिवस' म्हणत मांडली रोखठोक भूमिका!

Latest Marathi News Update: पिंपरी-चिंचवड महापालिकेत मुख्य अभियंता प्रवीण ओंबासे एसीबीच्या जाळ्यात

iPhone Duo Screen Issue: Apple iPhone Duoच्या स्क्रीनला तडे! कंपनीकडून रिप्लेसमेंट मिळणार का? नेमकं प्रकरण काय जाणून घ्या

SCROLL FOR NEXT