now crime department will keep watch on complaints in police station  
मुंबई

Police Department: पोलिसांची निम्मी पदे रिक्त, ठाण्याला रिक्त पदांचे ग्रहण

CD

जव्हार, ता. २४ (बातमीदार) : तालुक्यातील सरकारी कार्यालयातील रिक्त पदे अतिशय चिंतेचा विषय आहे. अशातच तालुक्यात शांतता आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या जव्हार पोलिसांचीही निम्मी पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. जव्हार पोलिस ठाण्याला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार तालुक्याच्या एक लाख ४२ हजार ३४७ लोकसंख्येसह ११६ गावे व २९३ पाड्यांच्या सुरक्षेचा भार केवळ ४४ पोलिस कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. पोलिसांचा कामाचा आवाका मोठा असला, तरी कर्मचारी, अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे कामाचा ताण वाढत असल्याने पोलिसही त्रस्त झाले आहेत. शहराच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वरिष्ठ पोलिस प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करून पोलिस संख्या वाढवण्याची गरज आहे.

तालुक्यात रोज घडणाऱ्या घटना, अपघात, वाहतूक कोंडी पाहता पोलिसांची संख्या कमी आहे. अनेक रिक्त पदांमुळे पोलिसही हतबल होत आहेत. येथे पोलिस निरीक्षक आणि सहायक पोलिस निरीक्षक यांचे प्रत्येकी एक पदे मंजूर असून ते भरलेले आहे; मात्र कर्मचाऱ्यांची ८८ पदांना मंजुरी आहे. मात्र प्रत्यक्षात ४४ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातही ११ महिला, दोन चालक, तसेच दररोज सुट्टीवर असणारे कर्मचारी, आजारी रजेवरील कर्मचाऱ्यांमुळे उपलब्ध असलेल्यांना तारेवरची कसरत करावी लागते. कामाच्या व्यापात अनेकदा पोलिसांना त्यांच्या कुटुंबीयांना पुरेसा वेळ देता येत नाही.

पोलिसांवर कामाचा ताण
पोलिस कर्मचारी संख्या निम्म्याहून कमी असल्याने अधिक कामाचा ताण पडतो. कामाच्या तासांबाबत कधीही निश्चितता नसते. अनेकदा बंदोबस्तामुळे ऐनवेळी साप्ताहिक रजा रद्द होते. कामाच्या व्यापामुळे कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नाही, असे एका पोलिस कर्मचाऱ्याने सांगितले.

सध्या उपलब्ध असलेल्या पोलिस बळावर काम सुरू आहे. शहरासह ग्रामीण भागाच्या सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्त लावला जातो. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहराच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार काम केले जात आहे.
- संजयकुमार ब्राह्मणे, पोलिस निरीक्षक, जव्हार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Live Updates: "सरकार संवेदनाशून्य, भाजप मराठी माणसाचा खरा शत्रू" ; आदित्य ठाकरे यांचा घणाघात

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT