मुंबई

Palghar: "मागण्या मान्य करा, नाहीतर.." सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आशा स्वयंसेविकांचा दांडिया मोर्चा

CD

पालघर, ता. २४ (बातमीदार) : वाढत्या महागाईत तुटपुंज्या पगारात गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. सरकार दरबारी त्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित असल्याने जगायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे.

त्यांची होणारी परवड शासन दरबारी पोहोचावी, याकरिता महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाने पालघर जिल्हा परिषदेवर दांडिया मोर्चाचे सोमवारी (ता. २३) आयोजन करत दांडिया खेळत जिल्हा परिषद कार्यालयावर धडक दिली. ‘मंत्री खातात तुपाशी, आम्ही मात्र उपाशी’, ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा’ अशा घोषणांनी जिल्हा परिषद कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला होता.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पालघर जिल्ह्यात सुमारे २,०१८ स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहे. त्यांची नियुक्ती जिल्हा परिषदेकडून करण्यात आली, मात्र त्यांना अल्प मानधन दिले जाते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू शकत नाही. नवी मुंबई व अन्य नगरपालिकेमध्ये स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना सुमारे ११ हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाते.

तसेच ठाणे पालिकेने पाच हजारांचा बोनस स्वयंसेविकांना दिला आहे. त्याचप्रमाणे पालघरमधीलही आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना बोनस मिळणे आवश्यक आहे. आशा व गटप्रवर्तकांना त्यांच्या नियमित कामावर आधारित एक महिन्याच्या मोबदल्याएवढे अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात आली. या वेळी संघाचे सरचिटणीस भगवान दवणे यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Tracker: दिल्ली होरपळतेय, मुंबई पाणी जपून वापरतेय... पाऊस नेमका अडकला कुठे? मान्सूनची अनपेक्षित सुस्ती

Donald Trump: ''खोटं बोलण्यालाही मर्यादा असतात..'', इटलीच्या पंतप्रधान मेलोनी ट्रम्प यांच्यावर चिडल्या, सोबत फोटो काढण्यावरुन वाद

Wagholi Water Supply Issue : वाघोलीचा पाणी पुरवठा शुक्रवार पासून पूर्णपणे बंद; वढू बुद्रुक येथील भीमा नदी बंधाऱ्यातील पाणी पूर्णपणे तळाला

Jalgaon News : मोसमी पाऊस येण्यापूर्वीच शेतकऱ्यांकडून पेरणीची घाई; जिल्‍ह्यात ३३ हजार हेक्‍टरवर कपाशीचा पेरा, मक्‍यासह सोयाबीन, मुगाची लागवड

Thane News: ठाणेकरांची प्रतीक्षा संपली! पहिली एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस अखेर रस्त्यावर; कसे असेल वेळापत्रक?

SCROLL FOR NEXT