mumbai local sakal
मुंबई

Mumbai Local: पोलिसांची तत्परता ! लोकलमध्ये विसरलेली बॅग महिलेच्या स्वाधीन, लाखो रुपयांचे मौल्यवान सामान परत मिळाले..

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २४ : कल्याण रेल्वे स्थानकात एक महिला तिची बॅग लोकलमध्ये विसरली. या बॅगेत लॅपटॉप, विदेशी चलन अशा मौल्यवान वस्तू होत्या. घरी गेल्यानंतर आपण बॅग विसरल्याची बाब महिलेच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ याची माहिती सीएसएमटी नियंत्रण कक्षास दिली. पोलिसांनी ताबडतोब सूत्र हलवत चौकशी केली असता, तेव्हा ही लोकल ठाकुर्ली यार्डात गेली असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे महिलेला विसरलेली बॅग परत मिळाली आहे. बॅगमधील मुद्देमाल कल्याण रेल्वे पोलिसांनी महिलेच्या ताब्यात दिला असून महिलेने पोलिसांचे आभार मानले.

कल्याणमधील योगीधाम परिसरात राहात असलेल्या पौर्णिमा मेनोन या मुंबईत नोकरी करतात. नोकरीनिमित्त त्या दररोज लोकलने प्रवास करतात. शनिवारी रात्री पौर्णिमा कल्याण रेल्वे स्थानकात घाई गडबडीत उतरून घरी गेल्या. त्यानंतर त्यांना आपली कार्यालयात नेलेली बॅग लोकलमध्ये विसरल्याची बाब लक्षात आली. त्यांनी मध्य रेल्वेच्या सीएसएमटी येथील नियंत्रण कक्षाला संपर्क करत घडला प्रकार सांगितला. नियंत्रण कक्षातून ही माहिती कल्याण रेल्वे स्थानकातील रेल्वे सुरक्षा बलाला देण्यात आली.


रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी चौकशी केली असता कल्याण रेल्वे स्थानकातून लोकल ठाकुर्ली यार्डमध्ये गेल्याची माहिती मिळाली. ठाकुर्ली यार्डातील रेल्वे सुरक्षा बलाचे जवान जल सिंह यांना कल्याण रेल्वे स्थानकातून यार्डात आलेल्या कल्याण लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात एका महिला प्रवाशाची कार्यालयीन बॅग विसरल्याची माहिती देण्यात आली.

सिंह यांनी त्या डब्यात जाऊन बॅग ताब्यात घेऊन डोंबिवली रेल्वे सुरक्षा बलाच्या ताब्यात दिली. बँगेची तपासणी करण्यात आली. त्यात एक लॅपटाॅप, १०० अमेरिकन डाॅलरच्या ३० नोट असे एकूण ३ लाख २९ हजार रुपयांचे सामान बॅगमध्ये आढळून आले. रविवारी सहायक उपनिरीक्षक राज कुमार यांच्या उपस्थित पौर्णिमा यांची बॅग त्यांच्या ताब्यात देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLAs Suspends: पक्षाविरोधी भूमिका नडली! BJD कडून सहा आमदारांचे तात्काळ निलंबन; टोकाचा निर्णय घेण्याचं नेमकं कारण काय?

Ashok Kharat Files: ''योनी पूजनाचे धक्कादायक व्हिडीओ...'', नेत्याचा खळबळजनक दावा, कॅप्टन खरात नेमकं करायचा तरी काय?

Gas Cylinder Shortage : जनता 'गॅस' वर स्वयंपाक चुलीवर...; ग्रामीण भागासह शहरातील हाॅटेल व्यावसायिकांना फटका...

तरडे–शिंदवणे रस्त्यावर स्ट्रीट लाईटची मागणी; अपघात टाळण्यासाठी नागरिकांची पुढाकार

Pachod Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार; एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT