बदलापूर : लोकलमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवाशांनी लावलेली रांग. 
मुंबई

बदलापूर स्थानकात रंगला महिलांचा भोंडला

CD

बदलापूर, ता. २४ (बातमीदार) : रोज आपल्या कामाच्या वेळी नियोजित ठिकाणी सुरक्षित पोचविणाऱ्या लोकलचे ऋण म्हणून, दरवर्षीप्रमाणे यंदाही बदलापूर रेल्वे स्थानकात लोकलचे पूजन करून महिलांना काही मिनिटांसाठी ठेका धरत भोंडला खेळला. तसेच रोजच्या प्रवासात सुख दुःख वाटत असलेल्या आपल्या सहकाऱ्यांसह दसरा सण साजरा केला.

रेल्वे प्रवाशांसाठी लोकल रेल्वेप्रती ऋण व्यक्त करण्याचा सोहळा म्हणून दसऱ्याकडे पाहिले जाते. सोमवारी म्हणजेच दसऱ्याच्या आदल्या दिवशी बदलापूर रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक १ आणि २ वर रेल्वे प्रवासी सहकारी मित्र संस्था बदलापूर यांच्या वतीने व इतर सहप्रवाशांनी उत्साहात दसरा साजरा केला. सकाळी साडेपाच वाजल्यापासून बदलापूर रेल्वे स्थानकात येणाऱ्या लोकल प्रवासी संघटनांकडून सजवल्या जात होत्या.

बदलापूर रेल्वे स्थानकात लोकलचे पूजन करून महिलांना काही मिनिटांसाठी ठेका धरत भोंडला खेळला. यावेळी मोटरमन, स्थानक व्यवस्थापक, रेल्वे पोलिसांचा सत्कार यावेळी करण्यात आला. या सगळ्या कार्यक्रमात महिला वर्गाचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. या कार्यक्रमाचे नियोजन रेल्वे प्रवासी सहकारी मित्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश महाजन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

सुरू होऊन ८ महिने नाही झाले तोच निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका? मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चेला उधाण

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

Tata Sons Boardroom: बोर्डरूममध्ये टाटा सन्सचे ‘बंड’; सूत्रे पुन्हा चंद्रशेखरन यांच्याकडे, नोएल टाटांची नाराजी कायम

Agriculture Corruption: कृषी खात्यामध्ये भ्रष्टाचाराचे उदंड ‘पीक’; राज्यात १६५ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT