मुंबई

महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी कंचन मिश्रा

CD

अंबरनाथ (बातमीदार) : कल्याण जिल्हा भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी कंचन मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली. माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कल्याण जिल्हा महिला मोर्च्याच्या अध्यक्षा रेखा चौधरी यांच्या हस्ते कंचन मिश्रा यांना नुकतेच नियुक्ती पत्र देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांसाठी राबवलेल्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याला प्राधान्य देणार असल्याचे कंचन मिश्रा यांनी यावेळी सांगितले. यावेळी अंबरनाथ भाजप शहर अध्यक्षा सुजाता भोईर यावेळी उपस्थित होत्या.
…..
विकास आराखडाच्या हरकती दाखल करण्याचे इंजिनियर्स असोसिएशनचे आवाहन
भिवंडी (बातमीदार) : येत्या २० वर्षांसाठी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचा नवीन विकास आराखडा आयुक्त अजय वैद्य यांनी मागील महिन्यात प्रसिद्ध केला आहे. हा आराखडा नागरिकांना पाहण्यासाठी पालिकेच्या मुख्य कार्यालयात ठेवण्यात आला असून त्यावर हरकती दाखल करण्याचे त्यांनी आवाहन केले. नागरिकांना आपल्या हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत १० नोव्हेंबरपर्यंत असून तत्पूर्वी नागरिकांनी आपल्या सूचना व हरकती वेळेत दाखल कराव्यात, असे आवाहन भिवंडी आर्किटेक्ट अँड इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष जलाल अंसारी व सरचिटणीस जावेद आजमी यांनी केले. विकास आराखडा हा शहराचा चेहरा असून पुढील वीस वर्षांसाठी ज्या नवीन विकास योजना व प्रयोजन तयार केले आहे, त्याचे सर्वांगीण चित्र यात मांडण्यात आले आहे. याबाबत नागरिकांनी आपल्या सूचना, हरकती वेळेत दाखल केल्यास त्यांचा विचार होऊ शकतो. त्यासाठी नागरिकांनी पुढे येणे गरजेचे आहे, असे जलाल अंसारी यांनी सांगितले.
…..
ठाण्यात ‘आयुष्यमान भारत’ नोंदणी शिबिर
ठाणे (बातमीदार) : जनी जनार्दन सेवा समिती चॅरिटेबल दवाखान्याच्या वतीने प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत हे शिबिर डॉ. मूस रोड, नौकाविहार समोर, तलावपाळी या ठिकाणी होणार आहे. या शिबिरासाठी येताना आधार कार्ड घेऊन यावे, अशी सूचना आयोजकांनी करून गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
…..
केडीएमसी कर्मचाऱ्यांना हवा २५ हजारांचा बोनस
कल्याण (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस २५ हजार रुपये द्यावा, अशी मागणी म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी कामगार सेनेचे अध्यक्ष बाळ हरदास यांच्यासह पदाधिकारी सचिन बासरे, तात्या माने, अजय पवार, सुनील पवार आदी उपस्थित होते. मागच्या वर्षीही युनियनच्या वतीने २५ हजार दिवाळी बोनस द्यावा अशी मागणी केली. तेव्हा महापालिकेची आर्थिक स्थिती खालावलेली असल्याने कामगारांना १७,५०० रुपये बोनस देण्यात आला होता. यंदा मात्र महापालिकेची स्थिती चांगली आहे. त्यामुळे मागणीच्या रक्कमेच्या आसपास बोनस मिळणार असल्याची आशा कामगारांसह युनियनला आहे.
……

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs DC Live : समीर रिझवीचा तांडव! शतक हुकले, दिल्लीचा दणदणीत विजय; मुंबईची हार, Point Table मध्ये मोठी उलथापालथ

पार्क केलेली थार अचानक रिव्हर्स आली, महिलेचा चिरडून मृत्यू; VIDEO VIRAL

धक्कादायक! जत्रेतील आकाशपाळणा कोसळून मोठी दुर्घटना, ४० जण जखमी, Video Viral

Latest Marathi News Live Update : मुंबईहून 18 टन ऑटो LPG संभाजीनगरमध्ये जाणार

Nanded Gangwar: नांदेडमध्ये मध्यरात्री गॅंगवार; जुन्या वैमनस्यातून तलवार-खंजीर हल्ल्यात तिघांचा खून, शहरात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT