मुंबई

डोंबिवलीत मासळी बाजारात शुकशुकाट

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली ता. ३ ः आज डोंबिवलीत स्थानिक मच्छीमारांनी बंद पुकारला होता. त्यामुळे मासळी बाजारात येऊन ग्राहकांना मासे विकत घेण्यासाठी बरीच शोधाशोध करावी लागली. बाहेरील मासे विक्रेते डोंबिवलीत येऊन व्यवसाय करतात अशी तक्रार करत स्थानिक मच्छीमार करत आहेत. त्याचा निषेध म्हणून हा बंद पाळण्यात आला.

आगरी कोळी मच्छी विक्रेता सेवा संस्थेच्या वतीने शुक्रवारी मासळी बाजार बंद ठेवत आंदोलनाची हाक देण्यात आली होती. मासळी विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात या बंदमध्ये सहभाग नोंदवला. डोंबिवली पश्चिमेतील उमेश नगर परिसरात भरणारा किरकोळ मासळी बाजार हा उभ्या डोंबिवलीत प्रसिद्ध आहे. गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी स्थानिक कोळी मासे विक्रीचा व्यवसाय करत आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून वसई आणि आसपासच्या परिसरातील मासे विक्रेते डोंबिवलीमध्ये येऊन व्यवसाय करत आहेत. त्यामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याची तक्रार स्थानिकांची आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी डोंबिवलीतील मच्छीमार महिलांना सहकार्य करण्याऐवजी वसईहून येणाऱ्या मासे विक्रेत्यांना सहकार्य करत असल्याबद्दलही मासे विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली. आमच्या मागणीची दखल न घेतल्यास आणखी उग्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी महिला मासे विक्रेत्यांच्या संघटनेतर्फे देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

आगमन मिरवणुकीत पुन्हा अपघात! ट्रॉली उलटल्याने गणेशमूर्ती कोसळली; अंगावर शहारा येणारा Video Viral

BRICS Summit 2026 : एकाच शक्तीचं कायम वर्चस्व शक्य नाही’; BRICS मध्ये जिनपिंग यांची अमेरिकेवर टीका, पंतप्रधान मोदींचे मानले आभार

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Ganeshotsav Security : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ व शेटफळमध्ये पोलिसांचे पथसंचलन; गुन्हेगारांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT