मुंबई

देहविक्रय करायला लावणाऱ्या महिलेला अटक

CD

ठाणे, ता. ३ (वार्ताहर) ः तरुणींना देहविक्री करण्यास भाग पडणाऱ्या एका महिला एजंटला ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने बदलापूर शहरातून अटक केली. एजंट महिलेच्या ताब्यातून एका अल्पवयीन मुलीची आणि एका २० वर्षीय तरुणीची सुटका करण्यात केली.

ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकास बदलापूर शहरात एक महिला एजंट देहविक्रयासाठी मुली पुरवते अशी माहिती मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास बदलापूर पूर्वेच्या स्टेशन समोरील हॉटेल नवरत्न पॅलेसमध्ये छापा मारला. यावेळी एका महिला एजंटला पोलिस पथकाने अटक केली. तिच्या तावडीतून एका अल्पवयीन मुलीची व एका तरुणीची सुटका करण्यात आली. आर्थिकदृष्टया कमकुवत असणाऱ्या तरुणींना देहविक्री करण्यास भाग पाडून त्यातून मिळालेल्या पैशांवर उपजीविका करण्याचे काम ही महिला एजंट करीत होती. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gangapur News : अवैध दारू विक्री वाढल्याने वरखेड गावात महिला व ग्रामस्थांनी काढला गांधीगिरी मोर्चा; दारू विक्रीविरोधात ग्रामसभेत ठराव मंजूर

Nilanga News : मदतीसाठी कागदपत्रांचा ससेमिरा! गावाचा एकच पंचनामा करून सरसकट मदत द्या; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी

Latest Marathi News Live Update : शिक्षक भरतीत लाखोंची फसवणूक, अपूर्व हिरेंसह पाच जणांवर गुन्हा

Pune News : उजनीतील खासगी मासेमारी ठेका प्रक्रिया रद्द; जलसंपदा विभागाच्या बैठकीत निर्णय

Baramati Crime : शेरेवाडी दुहेरी खूनाचा गुन्हा उघड....; नातलगानेच केला दुहेरी खून....

SCROLL FOR NEXT