मुंबई

Dombivali: सह्याद्री बॅकेला जागा खाली करण्याचे आदेश, कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावला एक कोटी पाच लाखांचा दंड

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ८ : पूर्वेतील फडके रोडवरील सह्याद्री को ऑप. बॅंकेला एक महिन्याच्या आत मालमत्ता धारकाची जागा खाली करण्याचे आदेश कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने दिले आहेत. तसेच बॅंकेला एक कोटी पाच लाखांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. डोंबिवलीतील जोंधळे विद्या समूहाचे मालक शिवाजीराव जोंधळे यांच्या मालकीची ती जागा असून ती जागा परत मिळावी म्हणून जोंधळे यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. यावर निकाल देताना न्यायालयाने वरील आदेश दिले.

फडके रोडवरील चिराग सोसायटीमध्ये एक हजार १०८ चौ. फुटाची मालमत्ता ही शिवाजीराव जोंधळे यांची आहे. ही मालमत्ता जोंधळे यांनी काही अटीशर्तींवर सह्याद्री बँकेला भाड्याने दिली होती. कालांतराने ती जागा कामासाठी बॅंकेने जागा खाली करावी म्हणून जोंधळे यांच्याकडून बॅंकेला वारंवार नोटीस पाठवण्यात येत होती. मात्र त्याची दखल बँक व्यवस्थापनाकडून घेतली जात नव्हती.

बँकेकडून जागा खाली केली जात नसल्याने अखेर जोंधळे यांनी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात यासंदर्भात एक दावा दाखल केला होता. यात सह्याद्री बँकेला तातडीने जागा खाली करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती. कल्याण न्यायालयाचे वरिष्ठ खंडपीठाचे न्यायाधीश ए. एस. लांजेवार यांनी दोन्ही बाजू ऐकून घेऊन बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बँकेचे मागील थकलेले सुमारे एक कोटी २३ लाखाचे भाडे २४ लाखाच्या व्याजासह देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बँकेने कराराप्रमाणे भाडे देणे थकविल्याने ही याचिका करावी लागली, असे जोंधळे यांनी सांगितले.

मागील १३ वर्षापूर्वी ही मालमत्ता आपण बँकेला दरमहा एक लाख चार हजार रुपये दराने भाड्याने दिली होती. दरवर्षी या जागेचे भाडे वाढविले जात होते. बँकेबरोबरचा करार २०१६ मध्ये संपला. तेव्हापासून बँकेला आपण जागा खाली करण्यासाठी नोटिसा देत होते. त्याची दखल घेतली जात नव्हती असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed : १० वर्षांपासून फरार पण, प्रचारसभांमध्ये सहभाग; अखेर शिवसेनेच्या बड्या नेत्याला बीडमधून उचललं

Summer UTI Alert : गरमी वाढली की लघवीत जळजळ होतेय? असू शकतो UTI चा इशारा; त्रास टाळण्यासाठी करा 'हे' सोपे घरगुती उपाय

टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला गेला! Mumbai Indians स्टारने इतिहास रचला, जगातील पहिला असा संघ ज्याने...

दिल्ली जिंकणारे शिंदे जोतिबासमोर व्हायचे नतमस्तक; जाणून घ्या अभिमानाची कथा

'शेम टू शेम'चित्रपटात साकारलेला लक्ष्मीकांत यांचा डुप्लिकेट; मालिकेत दररोज पाहता, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?

SCROLL FOR NEXT