मुंबई

Kalyan: खासदारांनी लक्ष दिल्यास ‘यु टाईप’ रस्ताचे काम लवकर, भाजप आमदाराचा मुख्यमंत्र्यांना टोला

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १५ : कल्याण पूर्वेतील यू टाईप रस्त्याचे काम लवकर व्हावे यासाठी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना यात पुढाकार घेत लक्ष घालण्याची विनंती केली. राजकारणात माझ्याकडे बोट दाखवले जात असले तरी सर्वांच्या अपेक्षा तुमच्याकडून आहेत. कारण मुख्यमंत्री तुमचे वडील आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निर्णय घ्यायला वेळ लावत नाही पण त्यांनी ते मनात आणलं पाहिजे असे म्हणत आमदार गायकवाड यांनी खासदार डॉ. शिंदे यांना कल्याण पूर्वेतील विकास कामांकडे लक्ष घालण्याची मागणी केली.

कल्याण पूर्वेतील एका कार्यक्रमात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, भाजप आमदार गणपत गायकवाड हे एकच मंचावर उपस्थित होते. यावेळी भाषणात आमदार गायकवाड यांनी कल्याण पूर्वेतील विकास कामांबद्दल बोलताना खासदार डॉ. शिंदे यांना यात लक्ष घालण्याची विनंती केली.

कल्याण पूर्वेतील काटेमानवली नाका ते गणपती चौक व्हाया म्हसोबा चौक ते तिसगाव नाका या यू टाईप रस्त्याच्या ८० फुटाचे रुंदीकरणाचे काम कल्याण डोंबिवली पालिकेने सुरू केले आहे. हे काम मात्र संथ गतीने सुरू आहे. हे काम पाहता यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला तर येत्या काळात हा रस्ता लवकर होऊ शकतो, असे आमदार गायकवाड म्हणाले.

राजकारणाच्या दृष्टीने जरी माझ्याकडे बोट दाखवले जात असले तरी जनता तुमच्याकडे बघते. कारण एकनाथ शिंदे हे असे मुख्यमंत्री आहेत की ते निर्णय घ्यायला वेळ लावत नाहीत. यासाठी त्यांनी यू टाईप रोड लवकर झाला पाहिजे, असे मनात आणलं पाहिजे, असे मत आमदार गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT