मुंबई

गंधर्वगान कार्यक्रमातून जवानांसाठी मदत

CD

डोंबिवली, ता. २१ (बातमीदार) : सवाई गंधर्वनिर्मित गंधर्वगान हा अभंग, नाट्यसंगीत, उपशास्त्रीय गायनाचा अनोखा कार्यक्रम नुकताच पार्ल्याच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात झाला. आनंदगंधर्व पंडित आनंद भाटे आणि स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांनी श्रोत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. डॉ. भरत बलवल्ली यांच्या गायनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर पंडित आनंद भाटे यांनी या स्वरपहाटमध्ये आपल्या स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. व्यास क्रिएशन्स आणि वीर सेनानी फाऊंडेशन यांच्या सहयोगाने झालेल्या या कार्यक्रमात भारतीय जवानांसाठी मदत केली.

कार्यक्रमाचे निवेदन मिलिंद कुलकर्णी यांनी केले. ऑर्गनवर ज्येष्ठ वादक मकरंद कुंडले, तबलासाथ प्रसाद करंबेळकर यांनी दिली. बासरी वरद कठापूरकर, पखवाज दादा परब आणि तालवाद्य एकनाथ परब यांनी साथसंगत केली. ''गंधर्वगान''ची संकल्पना आणि निर्मिती आकाश भडसावळे याची होती. ''सवाई गंधर्व'' या संस्थेने कार्यक्रमाची निर्मिती केली. कार्यक्रमाची सूत्र तपस्या नेवे यांनी हाताळली आणि व्यवस्थापन राकेश तळगावकर यांचे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत मोठा अनर्थ टळला! मोटरमनच्या क्षणभराच्या चुकेने प्रवाशांचा थरकाप, भांडूप स्थानक आलं तरी लोकल थांबली नाही, काय घडलं?

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणात मोठी उलथापालथ, भाजप अध्यक्षपदाच्या दिशेने

पुण्याची बातच न्यारी! मृणाल ठाकूरने पुण्यात येताच केली 'ही' गोष्ट, खास मराठी पोस्ट करत म्हणाली... 'पुण्यात आलो आणि...'

Indore Fire Accident : इमारतीला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू; इलेक्ट्रिक कार चार्जिंग करताना शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना

SCROLL FOR NEXT