मुंबई

मोबाईलवर गेम खेळण्यासाठी पालकांनी मनाई केल्यावर मुलाची आत्महत्या

CD

मोबाईलवर गेम खेळण्यास
वडिलांनी मनाई केल्याने
मुलाची आत्महत्या
मुंबई, ता. १८ : वडिलांनी मोबाईलवर गेम खेळू न दिल्याने १६ वर्षांच्या मुलाने मुंबईत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. १७) उघडकीस आली. मालवणी पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाला मोबाईलवर गेम खेळण्याचे व्यसन जडले होते. त्यांनी अनेकदा त्याला जास्त वेळ गेम न खेळण्याचा इशारा दिला होता; परंतु त्याने दाद दिली नाही. मोबाईल खेळायला दिला नाही तर स्वतःला हानी पोहोचवण्याची धमकीही त्याने दिली होती. गुरुवारी रात्री ११.३० च्या सुमारास वडिलांनी मुलाचा मोबाईल हिसकावून घेत त्याला झोपायला सांगितले. त्यानंतर सर्व कुटुंब झोपी गेले. शुक्रवारी सकाळी १०.३० च्या सुमारास वडिलांना जाग आली तेव्हा त्यांना त्यांचा मुलगा स्वयंपाकघरात गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळला. त्यांनी तातडीने त्याला एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मालवणी पोलिसांनी रुग्णालयात जाऊन मुलाच्या वडिलांचा जबाब नोंदवला. पोलिस शवविच्छेदन अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT