मुंबई

नवी मुंबईत ‘स्वच्छ टॉयलेट’ स्पर्धा

CD

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २२ : नागरिकांना अधिकाधिक दर्जेदार सुविधा देण्यासाठी महापालिका स्तरावर लवकरच स्वच्छ टॉयलेट स्पर्धा होणार आहे. जागतिक स्वच्छ टॉयलेट दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारतर्फे या स्पर्धेची नुकतीच केंद्रीयमंत्री धर्मेश पुरी यांच्या उपस्थितीत घोषणा झाली आहे. ज्याप्रमाणे स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येते. ही स्पर्धाही त्याचा एक भाग आहे. दर्जेदार स्वच्छतागृहाला राष्ट्रीय स्तरावर नावाजले जाणार आहे.
स्वच्छतेच्या बाबतीत नवी मुंबई शहर हे राज्यात अव्वल आहे. तर देशात पहिल्या तीन क्रमांकामध्ये आले आहे. शहरातील स्वच्छतेचा दर्जा कायम टिकवून ठेवणे हे महापालिकेवर मोठे आव्हान आहे. त्यापाठोपाठ आता केंद्र सरकारने आयोजित केलेल्या स्वच्छ टॉयलेट स्पर्धेलाही शहरात लवकरच सुरुवात होणार आहे. नागरी वसाहती, वाणिज्य कार्यालये, व्यवसायिक गाळे, बाजारपेठा, झोपडपट्टी आदी भागांत महापालिकेने तयार केलेले सामूहिक आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांची ही स्पर्धा असणार आहे. स्वच्छतेच्या ठरवून दिलेल्या निकषांवर किती स्वच्छतागृहे दर्जा राखून आहेत. याची पडताळणी दिल्लीतील केंद्रीय पथकांमार्फत होणार आहेत.

स्पर्धेचे उद्दिष्ट्ये
क्लीन टॉयलेट्स चॅलेंजच्या माध्यमातून स्वच्छता, सुलभता, डिझाइनमधील नावीन्य; तसेच कार्यक्षमतेचे उदाहरण देणारी मॉडेल सार्वजनिक शौचालये ओळखणे आदी आहे. यूएलबी, पॅरास्टेटल बॉडीज, खासगी संस्था यांचे सर्वोत्तम मॉडेल सामूहिक आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांना नामांकने देता येणार आहे. फक्त एका शौचालयाला नामांकन मिळणार आहे. सर्वोत्कृष्ट कार्यप्रदर्शन करणारी शौचालये १ ते १० डिसेंबरपर्यंत नामांकित केली जाणार आहेत.

राष्ट्रीय मान्यता
नामनिर्देशन अर्ज १ डिसेंबरपासून माय जीओव्ही पोर्टलवर थेट होणार आहे. या आव्हानाद्वारे निवडलेल्या सर्वोत्कृष्ट मॉडेल टॉयलेटला राष्ट्रीय मान्यता मिळणार आहे. २०२४ च्या सुरुवातीला प्रकाशित होणाऱ्या प्रकाशनातही ते वैशिष्ट्यीकृत केले जातील. शहरी स्वच्छतेच्या जटील आव्हानांना तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने भागीदार मंच सुरू केला. फोरम विकास भागीदार आणि क्षेत्र भागीदारांमध्ये कॉर्पोरेट्स कंपन्यांचा सीएसआर वापरता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी!'सातारा जिल्ह्यातील ९ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित'; कृषी विभागाची कारवाई; साठ्यांमध्ये तफावत

Crime : १६ वर्षांचा असताना FIR, ३५ व्या वर्षी दोषी अन् ३९ व्या वर्षी निर्दोष सुटका; अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा होता आरोप

Tejashri Pradhan Family : लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे?

Thane Metro: ठाणेकरांचे स्वप्न होणार साकार! मेट्रोच्या ट्रायलला लवकरच सुरुवात; 'या' तारखेपासून उतरणार सेवेत

Income Tax Bill 2025: नवीन आयकर विधेयक २०२५ मध्ये काय बदल होणार? निवड समितीने १० पॉईंट्समधून सगळंच सांगितलं!

SCROLL FOR NEXT