मुंबई

अंधेरी स्‍थानकात सापडले नवजात बालक

CD

अंधेरी स्‍थानकात सापडले नवजात बालक
अंधेरी, ता. २३ (बातमीदार) ः अंधेरी रेल्‍वे स्‍थानकात नवजात बालक सापडले आहे. या बालकाला रेल्‍वे पोलिसांच्‍या स्‍वाधीन करण्यात आले असून पुढील तपास करण्यात येत आहे.
येथील रेल्वे स्थानकावर २१ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक आठच्या दुभाजकावर एका लाकडी बॉक्समध्ये या नवजात बालकाला ठेवण्यात आले होते. या वेळी पुलावरून जाणाऱ्या एका प्रवाशाने मुलाचा रडण्याचा आवाज ऐकून तो फलाट क्रमांक आठवर गेला. या वेळी बॉक्‍स उघडून पाहिले असता आतमध्ये लाकडी पेटीत नवजात बालक पडलेले दिसले. त्‍याने त्‍वरित याची माहिती अंधेरी रेल्‍वे पोलिसांना दिली. या वेळी रेल्वे पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या या नवजात बालकाची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी अंधेरी रेल्वे पोलिसांनी आयपीसी कलम ३१७ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pollution: वाऱ्यामुळे प्रदूषणात घट! ‘एक्यूआय’मध्ये सुधारणा; कारवाईचाही हातभार

Maharashtra Police Bharti 2025 Update: भावी पोलिसांसाठी मोठी संधी; उमेदवारी अर्ज भरण्याबाबत झाला मोठा निर्णय

मुलीमुळे मैत्रीत दुष्मनी ! दिलीप कुमारांचा प्रेमाला विरोध पडला महागात; खास मित्राने मैत्रीच तोडली

Latest Marathi News Live Update : उमरगा शहरात शंभरी पार केलेल्या आजीने केले मतदान

श्रीराम नेनेंनी कधीच पाहिला नव्हता माधुरी दीक्षितचा सिनेमा, लग्नाबद्दल सांगताना धकधक गर्ल म्हणाली...' त्याना फक्त अमिताभ...'

SCROLL FOR NEXT